Chandrayaan 3 चंद्राच्या जवळ असतानाच…; फोटोसह इस्रोनं दिली मोठी बातमी
जवळपास महिन्याभराच्या प्रवासानंतर इस्रोच्या चांद्रयानानं आता चंद्राच्या (moon) आणखी जवळ पाऊल ठेवलं आहे. 14 ऑगस्ट रोजी चांद्रयानानं चंद्राच्या वर्तुळार कक्षेत प्रवेश केला होता. याआधी हे यान चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत परिक्रमा घालत होतं. आता मात्र यान चंद्रापासून अवघ्या 153 किमी x 163 किमी इतक्या अंतरावर असल्याची माहिती नुकतीच इस्रोनं दिली आहे.
बुधवारी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास चांद्रयान 3 चं चंद्रापासूनचं (moon) अंतर कमी होईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं. पण, चांद्रयानाच्या प्रवासातील या टप्प्यासाठी इस्रोनं माहिती देण्यास काही मिनिटांचा उशिर केला आणि अनेकांची चिंता वाढली. चांद्रयान 3 चंद्रापासून काही अंतरावर असतानाच कमीत कमी वेळासाठी इस्रोकडून एक फायरिंग करण्यात आली.
X वरून दिलेल्या माहितीनुसार या फायरिंगमुळं यान चंद्रापासून 153 किमी X 163 किमी इतक्या अंतरावर पोहोचलं. या टप्प्यावरच चांद्रयानाच्या कक्षा कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती इस्रोनं दिली. ज्यानंतर आता चांद्रयानाचा यापुढील आणि तितकाच महत्त्वपूर्ण प्रवास सुरु होणार आहे.