कोणता ब्रेड भारी ? ब्राऊन की व्हाईट ?

जगभरात ब्रेडचा (bread) वापर विविध प्रकारे केला जातो. कुणी चहासोबत, कुणी टोस्ट बनवून, जॅम लावून, सँडविचमध्ये, ब्रेड पकोड्यांमध्ये आणि विविध पद्धतीने ब्रेड खात असतात. मात्र आजकाल सर्वांचे फिटनेसकडेही (fitness) लक्ष असते. त्यामुळे बरेचसे लोकं हे फिट आणि हेल्दी राहण्यासाठी व्हाईट ब्रेडऐवजी अधिक ब्राऊन ब्रेड (brown bread) खाण्यास प्राधान्य देताना दिसतात.

खरंतर व्हाईट ब्रेड हा मैद्यापासून बनवला जातो आणि त्यामुळे फिटनेस फ्रिक लोकं हे ब्राऊन ब्रेड खाण्यास अधिक पसंती देतात. पण एवढा आरोग्यदायी पर्याय मानला जाणारा ब्राऊन ब्रेड खरोखरच आरोग्यासाठी तितका चांगला आहे का ? सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

पांढरा ब्रेड रिफाइंड पिठापासून म्हणजेच मैद्यापासून बनवला जातो. तर ब्राऊन ब्रेड हा गहू आणि इतर अनेक धान्ये मिसळून बनवला जातो. पौष्टिकतेबद्दल बोलायचे तर त्यात फायबर, कार्बोहायड्रेट, साखर, प्रथिने हे सर्वच असते.

आरोग्यासाठी ब्राऊन ब्रेड

ब्राऊन ब्रेडला (bread) हा हेल्दी मानला जातो, पण काहीवेळा त्यात मैदा, रंग, साखर आणि इतर अनेक संरक्षक देखील असू शकतात. म्हणजेच बाजारात ब्रेडचा नुसता रंग पाहून खरेदी करू नका, तर मोठ्या आणि नावाजलेल्या ब्रँडचा ब्राऊन ब्रेड घेण्यापूर्वी त्याच्या पॅकेटच्या मागील बाजूस लिहिलेले पदार्थ नक्की वाचा. त्यात मैदा नाही ना हे तपासून घ्यावे. कारण कधी-कधी हे ब्रेड तुमच्या आरोग्यासाठी व्हाईट ब्रेड म्हणजेच व्हाईट ब्रेडपेक्षाही जास्त हानिकारक ठरू शकतात.

ब्राऊन ब्रेडचे फायदे

एका अभ्यासानुसार, संपूर्ण होल ग्रेन ब्रेड खाल्ल्याने शरीरातील फायबरची कमतरता भरून निघते, तर फायबरमुळे तुमची पचनक्रियाही चांगली राहते. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. तुम्ही रोज एक ते दोन होल ग्रेन ब्रेड खाऊ शकता.

ब्राऊन ब्रेड खाणे किती योग्य ?

अलीकडच्या काळात ब्राऊन ब्रेडचे मार्केट खूप वाढले आहे आणि फिटनेस फ्रिक पांढर्‍याऐवजी ब्राऊन ब्रेड घेण्यास प्राधान्य देत आहेत. बरेचदा लोक नाश्त्यामध्ये त्याचा समावेश करतात. तुम्ही निरोगी राहण्यासाठी ब्राऊन ब्रेड सेवन कर असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण ब्राऊन ब्रेडचा रंग अधिक चमकदार आणि तपकिरी करण्यासाठी त्यामध्ये अनेक वेळा कृत्रिम रंग वापरले जातात. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *