‘या’ भाज्यांच्या सेवनाने मिळतो फायदा, त्वचा दिसेल नितळ !
प्रत्येक व्यक्तीला हेल्दी आणि चमकदार किंवा ग्लोईंग स्किन (glowing skin) हवी असते. त्यासाठी बहुतांश लोक अनेक उपाय करतात. काही जण महागड्या ट्रीटमेंट घेतात, तर काही लोकं ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापरत करतात. मात्र दरवेळेस त्याचा उपयोग होईलच असे नाही. आपण जे अन्न पदार्थ खातो, त्याचा आपल्या आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेवरही परिणाम (effect on skin) होतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यामुळेच हेल्दी त्वचा हवी असेल तर व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सीडेंट यांनी युक्त असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. त्यामुळे आपली त्वचा (skin) सुंदर, नितळ बनू शकते.
त्यासाठी तुम्ही आहारात काही भाज्यांचा नियमित समावेश करू शकता. त्यांच्या सेवनाने त्वचेला फायदा होऊ शकतो आणि त्वचा चमकदार दिसू शकते. त्या भाज्या कोणत्या हे जाणून घेऊया.
काकडी
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ती सेवन केल्याने त्वचा हायड्रेटेड राहते. तसेच त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात. काकडी खाल्ल्याने त्वचेला आराम मिळतो. त्याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. काकडी ही कोलेजनच्या निर्मितीमध्येही मदत करते. काकडीच्या सेवनाने त्वचेला फायदा होतो.
पालक
पालकामध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि व्हिटॅमिन ई यासारखी पोषक तत्वं असतात. तसेच त्यामध्ये बीटा कॅरोटिनदेखील असते. या भाजीच्या सेवनाने त्वचा (skin) हेल्दी बनते.
टोमॅटो
टोमॅटो हा लायकोपीनचा उत्तम स्रोत आहे. फ्री रॅडिकल्स मुळे होणारे त्वचेचे नुकसान आणि हानिकारक यूव्ही किरणे यांपासून संरक्षण करण्याचे कार्य टोमॅटोमधील अँटी-एजिंग गुणधर्म करतात. त्यामुळेच सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील बारीक रेषांपासूनही संरक्षण होते. तुम्ही टोमॅटोचे सेवन करू शकता तसेच दह्यामध्ये टोमॅटोची पेस्ट मिसळून ती चेहऱ्यावरही लावू शकता.
बीट
बीट हे व्हिटॅमिन सी आणि ए चा चांगला स्रोत आहे. बीटामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला डिटॉक्स करतात. बीटामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. तुम्ही बीटाची भाजी किंवा कोशिंबीर करू खाऊ शकता. तसेच त्याचा पॅक तयार करून चेहऱ्यालाही लावू शकता.
सिमला मिरची
सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. तसेच त्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मही असतात. त्याच्या सेवनाने त्वचा तरुण आणि चमकदार बनवते.