तब्बल 6 आजारांवर मात करते अंजीर, पण कसे व कधी खावे?

अंजीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुमच्या रोजच्या डाएटमध्ये अंजिराचा समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण अंजिर (fig) सेवन करण्याचे ही काही नियम आहेत. बदाम व काजूप्रमाणे अंजिरचे सेवन केले जात नसले तरी रोज 1 किंवा 2 अंजीर भिजवून खाल्ल्यास त्याचे पौष्टक गुणधर्म मिळतात. रात्री पाण्यात भिजवून त्याचे सेवन करावे, असं तज्ज्ञ सांगतात. रात्री झोपण्यापूर्वी 1-2 अंजीर रात्री पाण्यात भिजवत ठेवा त्यानंतर सकाळी उठून उपाशीपोटी भिजवलेले अंजीर खा. अंजिर खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहते. तसंच, अनेक आजारांवर मात करण्यासही अंजिराचा फायदा होतो.

अंजीर खाण्याबरोबरच अंजीराचे पाणीही शरीरासाठी फायदेशीर राहते. अंजीर खाल्ल्याने मिळणारे फायदे जाणून घ्या. अंजीरमध्ये मँगनीज, जिंक, मॅग्नेशियम, लोह अशी खनिजे मिळतात. अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबरही अधिक प्रमाणात असते. जाणून घेऊया अधिक फायदे.

प्रजनन क्षमता सुधारते

अजीरमध्ये अनेक मिनरल्स असतात. त्यात झिंक, मॅगनीज, मॅग्निशियम आणि आयरन सारख्या मिनरल्सचाही समावेश असतो. ज्यामुळं प्रजननक्षमता वाढते. हाय ऑक्सिडेंट आणि फायबरमुळं हार्मोन्स अंसतुलन आणि मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो. त्याचबरोबर मोनोपोजनंतरचा त्रासही अंजीर कमी करते. थकवा घालवण्यासाठी अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

अंजीरमध्ये पोटॅशियम असते तसंच, अजीरात असलेले क्लोरोजेनिक अॅसिड ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करते. त्यामुळं टाइप 2 डायबिटीस असलेल्या लोकांनी भिजवलेले अंजीर (fig) खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळं मधुमेह नियंत्रणात राहतो.

स्किन हेल्थ

डाएटमध्ये अंजीर व अंजीराचे पाण्याचा समावेश केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळं त्वचेचा पोत सुधारतो व त्वचा निरोगी व टवटवीत राहते. हेल्दी स्किनसाठी अंजीर एक सुपरफुड आहे.

वजन कमी करण्यास मदत करते

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तर अंजीर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. वजन कमी करण्यासाठी शरीराला जास्त फायबर असणाऱ्या फळांची गरज असते आणि फायबर तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या फायबरची कमतरता पूर्ण करते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

अंजीरमध्ये असलेले अॅटीऑक्सिडेंट शरीरातील फ्री रेडिकल्सपासून सुटका मिळवून देतो. त्याबरोबर ब्लड प्रेशर कमी करण्यासही मदत करते. अंजीर ट्राइग्लिसराइट लेव्हलही कमी करते त्यामुळं हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

अंजीर कसे खावे

सुके अंजीर खाण्याऐवजी भिजवलेले अंजीर खाणे फायद्याचे ठरते.अर्धा कप पाण्यात रात्री 2 अंजीर भिजवून सकाळी अनोषापोटी खावे. तसंच, अलर्जी संबंधित समस्या असतील तर डॉक्टरांना विचारात घेऊनच मग अंजीराचे सेवन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *