उपवास सोडताना चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नका; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला आणि श्रावणातील सणांना विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवार व शनिवार या दिवशी उपवास (fasting) करण्याची पद्धत आहे. तसंच, सणांनाही अनेक जणांकडून उपवास केला जातो. उपवासाला धार्मिक महत्त्व जरी असले तरी आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. उपवास केल्याने शरीर पूर्णपणे डिटॉक्सिफाय केले जाते व वजनही नियंत्रणात राहते. त्यामुळं उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीनेही फार फायद्याचे आहे. मात्र, उपवास केल्यानंतर एक चुक नेहमी केली जाते. ती म्हणजे उपवास सोडताना संध्याकाळी खूप सारे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळं उपवासाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. म्हणजेच पूर्ण दिवस उपाशी राहिल्यानंतर काही गोष्टी खाण्याचे टाळले पाहिजे. कारण त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकते. उपवास सोडताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, हे जाणून घेऊया.

पूर्ण दिवस व्रत किंवा उपवास केल्यानंतर चटपटीत खाणे टाळले पाहिजे. कारण उपवास करत असताना पोट रिकामे असते अशावेळी चटपटीत आणि मसालेदार जेवण खाल्ल्याने पोटदुखी, अपचन, अॅसिडिटीसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

उपवास सोडत असताना आंबट फळे खाणे टाळावे. कारण रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्याने अपचन आणि अॅसिडिटीसारख्या समस्या होऊ शकतात आणि त्यामुळं तुमची प्रकृती बिघडू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांना व्रत किंवा उपवास (fasting) न करण्याच्या सल्ला दिला जातो. तरीदेखील अनेकजण उपवास करतात. अशावेळी मधुमेह असलेल्या लोकांनी उपवास केल्यास सोडताना मसालेदार जेवण व जास्त जेवणे टाळावे. कारण पूर्ण दिवस उपाशी राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही अचानक जास्त जेवण करतात तेव्हा शुगरचा स्तर बिघडू शकतो.

काहीजण उपवास असताना चहा किंवा कॉफी घेतात हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. पूर्ण दिवस न जेवता राहिल्याने संध्याकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिज्म कमजोर होईल इतकंच नव्हे तर अॅसिडिटीदेखील वाढेल.

उपवास सोडताना काय खावे?

उपवास सोडत असताना सुरूवातीली शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढा. एक ग्लास पाणी प्या. त्यानंतर दही, ज्यूस, नारळ पाणी किंवा लिंबू सरबत पिऊ शकता. यामुळं शरीर हायृ्ड्रेट राहिलं. उपवास करत असताना उपाशी राहिल्यामुळं शरीरात ताकद आणि एनर्जीची कमतरता भासते. अशावेळी उपवास सोडत असताना प्रोटीनयुक्त जेवण करावेत. जेवणात कडधान्य असलेल्या भाज्या आणि पनीरपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *