टीम इंडियाच्या प्लेइंग-11 नसतानाही सूर्यकुमार यादवने जिंकला ‘हा’ अवॉर्ड

(sports news) आशिया कपच्या सुपर-4 फेरीत भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

मात्र, याआधी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 213 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 172 धावांवर गारद झाला.

दरम्यान सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतानाही एक अवॉर्ड जिंकला आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा सूर्यकुमार यादवने पर्यायी क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली आणि दोन अप्रतिम झेलही घेतले. सूर्याने 40.5 षटकांत घेतलेला झेल पाहून सर्वजण थक्क झाले. या शानदार झेलसाठी सूर्याला सामन्यानंतर सर्वोत्कृष्ट झेलचा पुरस्कार देण्यात आला.(sports news)

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने केवळ 213 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला 172 धावांवर रोखले. रोहित शर्माने 53 धावांची दमदार खेळी खेळली आणि तो भारतासाठी सर्वोत्तम धावा करणारा ठरला. तर भारताकडून कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *