तिसर्‍या वनडेतून शुभमन गिलसह ५ खेळाडू बाहेर! जिगरबाज खेळाडूंना मिळणार जागा?

(sports news) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 27 सप्टेंबर म्हणजे उद्या खेळल्या जाणार आहे. टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली आहे. शेवटचा सामना जिंकल्यानंतर आता पाहुण्या संघाला मालिकेत क्लीन स्वीप करता येईल. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या दोन सामन्यांमध्ये विश्रांती दिलेल्या वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन निश्चित आहे. युवा शुभमन गिलला विश्रांती देण्यात आल्याचे वृत्त आले आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एका सामन्याच्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी उपलब्ध असणार आहे, तर अष्टपैलू अक्षर पटेलला वर्ल्डकपपूर्वी दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ दिला जाईल. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. तसेच सलामीवीर शुभमन गिल आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांना काही दिवस विश्रांती देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांनी सांगितले की, “संघाच्या रोटेशन धोरणानुसार बुमराहला विश्रांती देण्यात आली होती आणि आता तो कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्यासह संघात परतेल. काही काळ सतत खेळत असलेल्या गिलशिवाय शार्दुल ठाकूरलाही तीन-चार दिवस विश्रांती देण्यात येणार आहे.

दुसऱ्या वनडेत शतक झळकावणाऱ्या सलामीवीर शुभमन गिलला विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान, ऋतुराज गायकवाड आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे तो तिसर्‍या वनडेचा संघाचा भाग असणार नाही. वरिष्ठ खेळाडू येणार त्याच्यामुळे सूर्यकुमार यादव आर अश्विनला बाहेर बसवता येईल. शार्दुल ठाकूरलाही विश्रांती देण्यात आल्याची चर्चा आहे. आर अश्विनच्या जागी कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो. (sports news)

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *