रोज मुठभर चणे आणि गूळ खा; आरोग्याला मिळतील अफलातून फायदे
ऑफिसमध्ये बसल्यावर भूक लागल्यावर वेफर्स किंवा जंकफुड असे खाणे मागवतो. मात्र, दररोज असे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. जंकफुड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो त्याचबरोबर बाहेरचे खाद्यपदार्थांमुळं कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो. अशवेळी छोटी भूक आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही गुळ-चणे खाऊ शकतात. गुळ आणि चणे खाल्ल्याने आरोग्याला अगणित फायदे मिळतात. जाणून घेऊया गूळ-चणे खाण्याचे फायदे.
महिलांना गूळ आणि चणे खाणे चांगले ठरते. यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणारे गुणधर्म असतात. फक्त गुळ आणि चणे खाणं जितकं फायदेशीर ठरत नाही तितक ते एकत्र खाणे फायदेशीर ठरते. चणे आणि गुण रक्त वाढवण्याबरोबरच शरीरातील इतर समस्याही दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. गुळामध्ये आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळं गुळ खाणं फायदेशीर ठरते. तसंच, गूळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासदेखील मदत करतो.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स
चण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सचा चांगला स्त्रोत असतो. त्यात फॉस्फरस, प्रोटीन आणि आयर्नदेखील मुबलक प्रमाणात असते. चण्याचे सेवन केल्यास शरीरातील अनेक समस्या दूर होण्यात मदत होते. किडनीसाठीही चणे अत्यंत फायदेशीर आहे.
गुळ आणि चणे एकत्र खाणे औषधासारखे आहे. गुळ आणि चणे एकत्र खाल्ल्याने आवश्यक असणारी पोषकतत्वे मिळतात. स्नायूंच्या बळकटीसाठी गुळाबरोबर चणे खाणे फायदेशीर ठरते. कारण चण्यात प्रोटीन असते. त्याचबरोबर मेटाबॉलिक रेटही उत्तम असतो त्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते.
गुळ आणि चण्यात असलेल्या झिंक हे त्वचेसाठी फायदेशीर असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी 6 मेंदूंचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. गुळ आणि चणे खाणे दात आणि हाडांसाठीही फायदेशीर ठरते. चणे आणि गुळ यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. हृद्यविकार असणार्यांमध्ये चणे गूळ हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. यामधील पोटॅशियम घटक फायदेशीर ठरतात.
रोज किती गूळ आणि चणे खावे?
गूळ आणि चण्याचे नियमित सेवन केल्यास वजन वाढत नाही. एका दिवसात व्यक्तीला साधारण 46 ते 56 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते आणि १०० ग्रॅम चणे खाल्ल्याने १९ ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळते. १० ग्रॅम गुळामध्ये ४ मिलीग्रॅममध्ये फॉस्फरस असते तर व्यक्तीला ७०० ग्रॅम फॉस्फोरसची गरज असते. दातांना मजूबती देण्यासाठी याचा उपयोग होतो.