Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स
व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आणि एअरटेलनंतर व्होडाफोन-आयडियाच्या युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना सोयीस्कर सेवा देण्यासाठी नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स आणत असते. जर तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यामध्ये काही प्लॅन्समध्ये रोजच्या डेटासोबत फ्री डेटाची सुविधाही मिळते.
व्होडाफोन-आयडियाकडे अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. दरम्यान, व्होडाफोन-आयडियाच्या लिस्टमध्ये असे 4 प्लॅन्स देखील आहेत, ज्यामध्ये युजर्सला 5GB अतिरिक्त डेटा पूर्णपणे मोफत मिळतो. जर तुम्ही असे काही काम करत असाल, ज्यासाठी जास्त डेटा आवश्यक असतो, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. यासोबतच, या सर्व प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस सोबत वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळते.
Vi चा 666 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन-आयडियाचा हा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा मिळतो. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सना 5GB डेटा मोफत मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटा सारख्या विशेष सुविधा देखील मिळतात. डेटा रोलओव्हरमध्ये तुम्ही सोमवार ते शुक्रवार शनिवार आणि रविवारी उर्वरित डेटा वापरू शकता.
Vi चा 699 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन-आयडियाचा (Vodafone Idea) हा प्लॅन 77 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसोबत 100SMS मोफत मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये व्होडाफोन-आयडियाचा युजर्सना 3 दिवसांसाठी 5GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटा सेवा देखील मिळते.
Vi चा 719 रुपयांचा प्लॅन
तुम्ही तुमचा व्होडाफोन-आयडियाचा नंबर 719 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 77 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा मिळतो. यासोबतच, मोफत व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधाही मिळते. तसेच, यामध्ये कंपनीकडून 3 दिवसांसाठी 5GB फ्री डेटा दिला जातो. इतर प्लॅन्सप्रमाणे, यात वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटाची सुविधा देखील आहे.
Vi चा 839 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन-आयडियाच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. कंपनी आपल्या युजर्सना 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करते. यामध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS ची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 5GB डेटा मोफत मिळतो. या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये ग्राहकांना Disney + Hotstar मोबाईलचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.