कारखान्यांचा बॉयलर 1 नोव्हेंबरला पेटणार?
राज्यातील 2023-24 मधील ऊस गाळप (strain) हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडे 217 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले असून अलीकडील काही वर्षांतील ते सर्वाधिक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या मंत्री समितीच्या बैठकीसाठी तारीख मिळण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्तालयाने पाठवला असून त्यानुसार बैठक निश्चिती होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
साखर आयुक्तालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा अंदाजित ऊस उपलब्धता 1 हजार 78 लाख टन राहील. त्यापैकी 90 टक्के ऊस गाळपास येईल, असे ग्राह्य धरून प्रत्यक्षात चालू वर्षी 970 लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर ते जानेवारी असा तीन महिन्यांचाच ऊस गाळप (strain) हंगाम राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) 15 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.