थंडीपासून वाचण्यासाठी ‘या’ पदार्थांचा खाण्यात करा समावेश
सध्या हिवाळ्याचे (winter) दिवस सुरू झाले आहेत, तर थंडीच्या या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप असे आजार निर्माण होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे खूप गरजेचं असतं. मग आपले कपडे असो आहार असो अशा प्रत्येक गोष्टींमध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. त्यात हिवाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे प्रत्येकाने योग्य तो आहार घेणे गरजेचे आहे.
मध –
मध खायला गोड आणि चविष्ट असते. तर हेच मध तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये मधाचा तुमच्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. मधामध्ये उष्णता वाढवण्याचे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर मध उपयुक्त ठरते. मध आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास देखील मदत करते. त्यामुळे मधाचा आपला आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
गूळ –
गुळ खायला बहुतेक लोकांना आवडते. तसेच गूळ हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहारात गुळाचा समावेश करतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा गुळाचा समावेश आपल्या आहारात करणं खूप फायदेशीर ठरतं. गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता टिकून राहते. तसेच आपल्या शरीराला लोह देखील मिळते. त्यामुळे गूळ खाणे खूप फायदेशीर ठरते. तसेच गुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास देखील मदत होते.
तूप –
तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे हिवाळ्यात (winter) तुपाचा समावेश आहारात करणं खूप गरजेचं असतं. तूप खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच आपले सर्दी, खोकल्यापासून देखील संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये तुपाचा समावेश तुमच्या आहारात आवर्जून करा.
TV9 मराठीचॅनल फॉलो करा