टीम इंडियाने हार्दिक पांड्यासाठी केलंय खास प्लॅनिंग

(sports news) भारतीय संघ दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याबाबत एक वेगळंच प्लॅनिंग करत आहे. हार्दिकला दुखापत झाल्यापासून तो संघाबाहेर आहे. यामुळे टीम इंडियाला प्लेईंग 11 चे गणित बसवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हार्दिक पांड्याच्या घोट्याचे लिगामेंट टीअर झाले आहे. हे टीअर ग्रेड 1 चे असल्याने तो सध्या विश्रांती करत आहे. त्याला बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात चेंडू पायाने आडवताना दुखापत झाली होती.

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे भारत – न्यूझीलंड सामन्याला मुकला होता. त्यानंतर आठवड्याभराने होत असलेल्या इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात देखील हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे. तो श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याला देखील मुकणार आहे. पांड्या संपूर्ण वर्ल्डकपला मुकतो की काय अशी शक्यता निर्माण झाली असतानाच बीसीसीआच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पांड्याच्या दुखापतीबद्दल आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल अपडेट दिली.

त्यांच्या मते हार्दिक पांड्या आता थेट सेमी फायनल राऊंडमध्येच खेळणार आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितले की, ‘पांड्या हा इंग्लंड आणि श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याला देखील मुकणार आहे. तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मात्र तो सेमी फायनलमध्ये तो आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. जर आम्ही इंग्लंड आणि श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला तर हार्दिक थेट सेमी फायनलमध्येच खेळेल.’

अधिकाऱ्याने सांगितले की हार्दिक बा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत आहे. तो पुढच्या आठवड्यापर्यंत तरी गोलंदाजी करणार नाही. पुढच्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे तंदुरूस्त होईल. त्यावेळी आपल्याला तो कितपत तयार आहे हे समजेल. (sports news)

भारतीय संघाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. त्यातील पाचही सामने जिंकून 10 गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. भारताने इंग्लंड किंवा श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकला की ते सेमी फायनलमधील आपली जागा पक्की करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *