चेहऱ्याला हळद लावत असाल थांबा, ही बातमी एकदा वाचाच
हळद (Turmeric) ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तसेच बहुतेक लोक आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर करतात. मग चेहऱ्यावरील टॅनिंग, पिंपल्स अशा समस्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक हळदीचा वापर करत असतात. पण हळदीचा वापर करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर हळदीमध्ये कर्क्युमिन हा घटक आढळतो जो बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. तसेच हा घटक विषाणूविरोधी मानला जातो.
हळदी लावल्यानंतर होणारे नुकसान
जर चेहऱ्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करत असाल तर तुमची समस्या कमी होण्याऐवजी ती समस्या वाढू शकते. कारण बहुतेक लोकांच्या चेहऱ्याला हळदी सूट होत नाही. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर डाग येऊ शकतात किंवा चेहऱ्यावर जळजळ निर्माण होऊ शकते. कारण हळदीमध्ये एक एलर्जी असते जी संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे हळद लावल्यानंतर काही लोकांच्या चेहऱ्याला खाज सुटते किंवा जळजळ जाणवते. त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या लोकांनी हळदीचा वापर करणे टाळावं.
चेहऱ्यावर हळदी (Turmeric) लावण्याचे अनेक नुकसान देखील आहेत. यामध्ये जर तुम्ही चेहऱ्याला हळद लावली तर तुमच्या चेहऱ्यावर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस होऊ शकतो. यामध्ये मग हळद लावल्यानंतर तुमच्या त्वचेला खाज सुटते किंवा डाग पडू शकतात.
चेहऱ्याला हळदी लावण्याची योग्य पद्धत
जर तुम्हाला हळदी पासून होणारे नुकसान टाळायचे असेल तर हळदीचा योग्य वापर कसा करायचा याबाबत जाणून घ्या. यासाठी चेहऱ्यावर कधीही हळदी तशीच लावू नका. जर चेहऱ्यावर तुम्ही हळदीचा वापर करणार असाल तर बेसन आणि हळदी मिक्स करून लावा किंवा बेसन कोरफड आणि दूध यामध्ये हळद मिसळून तुम्ही त्याचा फेस पॅक चेहऱ्यावरती लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याला हानी पोहोचत नाही. तुमच्या चेहऱ्यावरील समस्या देखील कमी होण्यास मदत होते.