भाऊबीजेच्या दिवशी अशा प्रकारे सजवा औक्षणाची थाळी, या चुका अवश्य टाळा

भाऊ आणि बहिणीचा विशेष सण म्हणजेच भाऊबीज (festival) 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी यमराजाची प्रार्थना करते. या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करूण घेतो, त्याला दीर्घायुष्य लाभते आणि त्याच्या जीवनात आनंद येतो, अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही सणात पूजेच्या थाळीला विशेष महत्त्व असते. पूजेच्या थाळीत ठेवलेल्या वस्तूंनीच आपली पूजा पूर्ण होते. पूजा थाळीत ठेवलेल्या गोष्टींची काळजी घेतली नाही तर आपली पूजा अपूर्ण राहू शकते. शास्त्रानुसार अशा काही गोष्टी या थाळीत ठेवल्या पाहिजेत, ज्या ठेवल्याने आपल्याला शुभ फळ मिळतात. या दिवसाचे महत्त्व काय आहे आणि भाऊबीजेला औक्षवणाच्या थाळीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवाव्यात हे जाणून घेऊया.

औक्षणाच्या थाळीत या गोष्टी ठेवा

औक्षणाच्या थाळीमध्ये नारळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नारळानंतर ताटात चांदीचे नाणे, सोन्याची अंगठी, फुले, अक्षत आणि सुपारी ठेवा.

भाऊबीजसाठी (festival) पूजा थाळी कशी तयार करावी

सर्व प्रथम, एक नवीन ताट घ्या आणि गंगाजलाने शुद्ध करा. यानंतर, ताटात एखादे फूल ठेवा. ताट फक्त झेंडूच्या फुलांनी सजवण्याचा प्रयत्न करा. यानंतर पूजेचे सर्व साहित्य – कुंकू, अक्षत, मौली धागा, सुके खोबरे, मिठाई इत्यादी ताटात ठेवा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भावाला ओवाळा. भावाला ओवाळल्यानंतर त्याच्या कपाळावर टिळा लावून तोंड गोड करा. तोंड गोड केल्यानंतर भावाला नारळ भेट म्हणून द्या.

भाऊबीजेच्या दिवशी या गोष्टींची काळजी घ्या

भावाला औक्षण करताना त्याच्या डोक्यावर टोपी किंवा रूमाल असणे आवश्यक आहे.

ओवाळताना भावाचे तोंड दक्षीणेकडे नसावे.

राहूकाळात भावाला ओवाळू नये.

ओवाळल्यानंतर भावाने बहिणीला ओवाळणी द्यावी.

बहिण मोठी असल्यास भावाने तीच्या पाया पडावे.

बहिणीने भावाला कपडे भेट देणे शुभ मानल्या जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *