अनुष्कानं विराटसाठी शेअर केली खास पोस्ट
(sports news) काल भारतीय क्रिकेट संघानं न्यूझीलंडच्या संघावर मात करत दमदार विजय मिळवला. भारताच्या या यशात विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांचं मोलाचं योगदान आहे. कोहलीनं त्याचं 50 वं वनडे शतक केलं तर शमीनं 7 विकेट घेत एक नवा विक्रम केला आहे. इतकंच नाही तर त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब देखील मिळाला आहे. या मॅचला पाहण्यासाठी विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्या शर्मा देखील तिथे पोहोचली होती. अशात जेव्हा विराटनं त्याचं 50 वं शतक केलं तेव्हा अनुष्कानं त्याला अनेक फ्लाईंग किस दिल्या. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे अनुष्का शर्मानं त्यानंतर सोशल मीडियावर विराटच्या शतकसाठी खास पोस्ट देखील शेअर केली आहे.
अनुष्का शर्मानं बुधवारी रात्री तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं विराटला देवाचं मुलं असं म्हटलं आहे. याशिवाय विराटची स्तुती करत तिनं आणखी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अनुष्कानं लिहिलं की ‘देव हा सर्वोत्कृष्ट लेखक आहे. देवाची मी खूप आभारी आहे की मला तुझं प्रेम मिळालं आणि मी तुला दिवसेंदिवस इतकं मजबूत होताना पाहिलं. त्यासोबत तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना मला बघता आलं. तू स्वत:शी आणि खेळाशी नेहमी प्रामाणिक राहिलास. तू खरोखरच देवाची देणगी आहेस.’
यानंतर अनुष्कानं आणखी एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. यात अनुष्का शर्मानं संपूर्ण टीम इंडियाची स्तुती केली आहे. यात सगळ्या खेळाडूंचा फोटो शेअर करत अनुष्का म्हणाली ‘This, Gun team’ त्याशिवाय अनुष्कानं आणखी एक स्टोरी शेअर केली असून त्यात तिनं ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा फोटो शेअर करत टाळ्या वाजवणारे इमोटीकॉन कमेंट म्हणून टाकले आहेत. यावेळी संपूर्ण मॅचमध्ये विराटला अनुष्का सपोर्ट करताना दिसली. (sports news)
दरम्यान, अनुष्का शर्मा ही सध्या तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. खरंतर विराट आणि अनुष्कानं या बातमीला दुजोरा दिलेला नाही. तिच्या कामाविषयी बोलायते झाले तर अनुष्कानं 2008 मध्ये ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर आता ती लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्का ही माजी क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.