गाढ झोप हवीये? वापरून पाहा ‘ही’ Military Method
(health news) उपलब्ध माहितीनुसार दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी लष्कराच्या U.S. Navy preflight school मधील अनेकांनाच या 120 सेकंदांच्या तंत्राची मदत झाली.
96 टक्के वैमानिकांना फायदा
साधारण 6 आठवड्यांच्या सरावानंतर जवळपास 96 टक्के वैमानिकांना याचा फायदा झाला. कॉफी पिऊन आणि आजुबाजूला गोळीबार सुरु असूनही त्यांना गाढ झोप लागली होती.
काय आहे ही पद्धत?
लष्कराच्या या पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुमचा चेहरा पूर्णपणे शांत करा, तोंड्याच्या आत असणारे स्नायू सैल सोडा.
शरीराचा ताण कमी करा
खांदे सैल सोडून त्यांचा ताण कमी करा. शरीर ज्या दिशेला आहे तिथं डोकं झुकवा.
दीर्घ श्वास
छातीतील ताण दूर करून एक दीर्घ श्वास सोडा. ज्यानंतर तुमचे पाय, मांड्या आणि पोटऱ्या सैल सोडा. (health news)
शांत राहा
एखादं निवांत चित्र डोळ्यांसमोर आणून डोकंही 10 सेकंदांसाठी शांत राहा.