वर्ल्ड कपमधील पराभवानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय
(sports news) टीम इंडियाला रविवारी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगला होता. ऑस्ट्रेलियाने 42 चेंडू आणि 6 विकेट राखून टीम इंडियावर विजय मिळवला. टीम इंडियाच तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच स्वप्न भंग झालं. तेच ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली. या जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर अजूनही संपूर्ण देशात निराशा आहे. पराभव झाल्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण खूपच भावनात्मक झालं होतं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली. त्यांच मनोबल, उत्साह वाढवला. वर्ल्ड कप फायनल हरल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माच्या डोळ्याच अश्रू तरळले. विराट कोहलीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. विराट प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला. पण, तो प्रेजेंटर रवी शास्त्री यांच्याशी एकही शब्द न बोलता खाली निघून गेला. यावरुन त्याची मनस्थिती लक्षात येते.
वर्ल्ड कपमधील या पराभवानंतर विराट कोहलीने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. विराट कोहली स्वत:ची कंपनी सुरु करु शकतो. कॉर्नरस्टोन कंपनीसोबत विराट कोहलीने आपली भागीदारी ब्रेक केलीय. 10 वर्ष विराट आणि कॉर्नरस्टोनची अभेद्य भागीदारी होती. क्रिकेटनेक्सटने आपल्या रिपोर्ट्मध्ये हे म्हटलय. कॉर्नरस्टोन ही बंटी सजदेहची कंपनी आहे. क्रिकेटच्या मैदानाबाहेर विराटच्या जाहीराती, व्यावसायिक हित आणि ब्रांड यांची जबाबदारी कॉर्नरस्टोन कंपनीवर होती. विराट कोहली आणि बंटी सजदेह हे दोघे परस्परांचे चांगले मित्र आहेत. मोठ्या क्रिकेट सामन्यांना बंटी सजदेहची सुद्धा उपस्थिती असायची.
कॉर्नरस्टोन बरोबर आणखी कुठल्या क्रिकेटर्सनी भागीदारी ब्रेक केली?
“मोठ्या आणि यशस्वी भागीदारीनंतर विराट कोहली आणि बंटी सजदेहचे मार्ग वेगळे झाले आहेत. मागच्या काही वर्षात अनेक क्रिकेटपटूंनी कॉर्नरस्टोनपासून फारकत घेतली. यात रोहित शर्मा, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल आणि अन्य काही आहेत. पण विराट आणि कॉर्नरस्टोनची भागीदारी अभेद्य होती. पण आता हे नातं सुद्धा संपलय” क्रिकेट नेक्सटने इंडस्ट्रीमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलय. (sports news)
डील संपवण्याचा निर्णय का घेतला?
विराट कोहलीने कॉर्नरस्टोन बरोबरची डील संपवण्याचा निर्णय का घेतला? त्यामागच कारण समजू शकलेलं नाही. विराट कोहली लवकरच स्वत:ची नवीन कंपनी सुरु करणार असल्याची माहिती आहे. विराट आजच्या घडीला अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर आहे. क्रिकेटच्या मैदानावरील इमेजमुळे विराटवर अनेक कंपन्या धनवर्षाव करतात. आता वर्ल्ड कप 2023 मधील त्याच्या परफॉर्मन्समुळे त्याची व्हॅल्यु आणि त्याच्याकडे येणाऱ्या ब्रॅण्डसची संख्या आणखी वाढू शकते.