घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा!
तुळस (Basil) ही शुभ मानली जाते, त्यामुळे वाळलेली तुळस ठेवणेही अशुभ मानलं जातं. वाळलेली तुळस घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा येते आणि घरावर आर्थिक संकट कोसळतं.
वाळलेली तुळस जमिनीत गाडा किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या. वाळलेली तुळस चुकूनही कचऱ्यात किंवा पेटवू नका. तुळशीला जाळणं नुकसानदायक असतं. आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या झाडाला हात लावू नका. रात्री चुकूनही तुळशीची पानं तोडू नका. तर एकादशी आणि द्वादशीलाही तुळशीची पानं तोडू नका.
तुळशीचं (Basil) रोप किचन किंवा बाथरूमजवळ अजिबात ठेवू नका. तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेवू नका. त्याशिवाय तिथे झाडू मारू नका. तर तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करण्यासाठी कापडाचा वापर करा. तुळशीजवळ कोणतंही काटेरी रोप ठेवणं शास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं.