‘आयपीएल’ लिलावाचा हातोडा मल्लिकाच्या हातात?

(sports news) ‘आयपीएल 2024’ च्या लिलावाचा कार्यक्रम 19 डिसेंबर रोजी दुबईत रंगणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचा लिलाव भारताबाहेर होणार आहे. आगामी आयपीएल लिलावात मल्लिका सागर (Mallika Sagar) ऑक्शनरच्या भूमिकेत दिसून येऊ शकते. मात्र, ‘बीसीसीआय’ने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मल्लिका सागरने यापूर्वीही ‘आयपीएल’ स्पर्धेत ऑक्शनरची भूमिका पार पाडली आहे. गतवर्षी तिने महिलांच्या डब्ल्यूपीएल स्पर्धेत ऑक्शनरवरची भूमिका पार पाडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय’ने तिला ‘आयपीएल’चा लिलाव होस्ट करण्याची ऑफर दिली आहे. तिने अजून होकार कळवलेला नसल्याचे समजते आहे.

लिलावात कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार आणि कोणता खेळाडू अनसोल्ड राहील, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. यावेळी सर्वांच्या नजरा खेळाडूंसह ऑक्शनरवर खिळल्या आहेत. ‘आयपीएल’चा लिलाव हा रिचर्ड मेडली करीत आलेला आहे. परंतु, 2018 पासून ही जबाबदारी एडमिडेस याच्याकडे देण्यात आली आहे. गेल्यावर्षी झालेल्या मेगा ऑक्शनसाठीही त्यांच्याकडेच लिलावाची जबाबदारी होती. परंतु, त्यांना अचानक भोवळ आल्यानेे ते खाली कोसळले. यानंतर तिथून पुढील जबाबदारी चारू शर्मा यांनी सांभाळली; पण यंदा ही जागा मल्लिका सागर घेण्याची शक्यता आहे.

पहिली महिला ऑक्शनर (IPL 2024)

रिचर्ड मॅडले, चारू शर्मा आणि ह्यू एडमिडस यांच्यानंतर ‘आयपीएल’ लिलावात ऑक्शनरची जबाबदारी स्वीकारणारी मल्लिका सागर ही पहिली महिला असेल. यावेळी ती फ्रँचायझी आणि खेळाडूंमध्ये सेतू म्हणून काम करेल. (sports news)

कोण आहे ही मल्लिका? (Mallika Sagar)

मल्लिका सागरने फिलाडेल्फिया येथील ब्रायन मावर कॉलेजमधून इतिहास या विषयातून पदवी घेतली आहे. त्यानंतर 2001 मध्ये तिने क्रिस्टीमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ती मुंबईतील सेंटर फॉर मॉडर्न अँड कंटेम्पररी इंडियन आर्टची संग्राहक सल्लागार आहेत. आर्ट इंडिया कन्सल्टंटस् फर्ममध्येदेखील भागीदार आहे. 2021 मध्ये झालेल्या प्रो-कबड्डीच्या लिलावात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *