तणाव आणि चिंतेमुळे त्रासला असाल तर ‘या’ फळाचा डाएटमध्ये नक्की करा समावेश
डाळिंबात (pomegranate) व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी अनेक पोषक तत्वं आढळतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात.
डाळिंबाचे सेवन केल्याने मेंदूतील तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे जर तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त असाल तर आहारात डाळिंबाचा अवश्य समावेश करा.
एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज डाळिंबाचा रस पितात त्यांच्यात तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी असते. म्हणजे डाळिंब प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो. कधी खूप तणावाखाली असाल तर डाळिंबाचा रस प्या किंवा डाळिंब जरूर खा.
मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी डाळिंब (pomegranate) खाणं हा एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मन शांत करण्यास मदत करतात. डाळिंबाचे सेवन केल्याने चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळतो.
डाळिंबाच्या सेवनाने तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटेल. रोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)