1st Test : संघाला मोठा धक्का! पहिल्याच दिवशी कर्णधार जखमी; आज खेळण्यावर सस्पेंस
(sports news) SA vs IND 1st Test कागिसो रबाडाच्या भेदक माऱ्यापुढे इतर सर्व फलंदाजांची त्रेधा उडत असताना के. एल. राहुलने मात्र जशास जसे उत्तर देत शानदार अर्धशतक केले. त्यामुळे ६ बाद १२१ अशा संकटात सापडलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय येईपर्यंत ८ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. यजमान संघाचा कर्णधार टेंबा बावुमा सामन्याच्या पहिल्या दिवशी जखमी झाला. या सामन्यात त्याचे पुढे खेळणेही संशयास्पद आहे. बावुमाच्या जागी विआन मुल्डर मैदानात उतरला.
सेंच्युरियनमधील मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला डाव्या हाताच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. या सामन्यात तो पुढे खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. भारताच्या डावाच्या 20व्या षटकात बावुमा जखमी झाला. (sports news)
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) नुसार, ‘स्कॅन्सवरून असे दिसून आले आहे की टेंबा बावुमाच्या डाव्या पायाला ताण आला आहे. त्याने पुढे खेळायचं का नाही हे डॉक्टर पाहत आहे. बावुमाच्या जागी डीन एल्गरने कार्यकारी कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. या मालिकेनंतर एल्गरने निवृत्ती जाहीर केली आहे.