KL Rahul सेंच्युरीनंतर बोलला मनातली गोष्ट, ट्रोलर्सना सणसणीत चपराक

(sports news) टीम इंडियाचा सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना सुरु आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्कवर हा कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडियाने या कसोटीत पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने 245 धावा केल्या. केएल राहुलच्या सेंच्युरीमुळे टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं. राहुलने 101 धावांची खेळी केली. टीमला सर्वात जास्त गरज असताना केएल राहुल ही इनिंग खेळला. राहुलने या शतकाने त्याच्यावर सतत टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलय. सोशल मीडियावर राहुलला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. मला माझ्या बॅटने उत्तर द्यायला आवडतं, असं राहुलने मॅचनंतर सांगितलं.

राहुलला सोशल मीडियावर सतत ट्रोल केलं जातं. काही सामन्यात अपयशी ठरल्यानंतर ट्रोलर्स त्याच्यावर तुटून पडतात. राहुल यामुळे कधीच त्रस्त होत नाही. तो अजून मेहनत करतो. बॅटने धावा बनवतो आणि टीकाकारांची तोंड बंद करतो.

राग येत नाही का?

बुधवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर राहुलला विचारलं, सोशल मीडियावर लोक तुला ट्रोल करतात, राग येत नाही का? त्यावर राहुलने एवढच उत्तर दिलं, असं करुन त्यांना काही मिळणार नाही. लोकांना जे बोलायचय ते बोलणार असं राहुल म्हणाला. तुम्ही पब्लिक परफॉर्मर आहात, तर तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सने उत्तर द्याव लागेल. त्याचवेळी तुमच्यावरील टीका कमी होईल. सोशल मीडियापासून जितका लांब राहतो, तितका आनंदी असतो असं राहुल म्हणाला.

राहुलने मनातली गोष्ट सांगितली

राहुलने 137 चेंडूत 14 फोर आणि 4 सिक्ससह झुंजार शतक झळकावलं. त्यामुळे भारताची धावसंख्या 250 च्या जवळपास पोहोचू शकली. हा काही फार मोठा स्कोर नाहीय. पण राहुलच शतक नसतं, तर टीम इंडियाच्या 150 च्या आत ऑलआऊट झाली असती. भारतीय फलंदाजांची जी 10 सर्वश्रेष्ठ शतक आहेत, त्यात सुनील गावस्कर यांनी केएल राहुलच्या शतकाचा समावेश केलाय. मॅचनंतर राहुलला प्रेस कॉन्फरन्समध्ये या बद्दल विचारण्यात आलं. (sports news)

गावस्कर माझ्याबद्दल असं बोलले असतील, तर ती मोठी गोष्ट आहे. दुखापतीमुळे जो वेळ मिळाला, त्यामुळे मला स्वत:वर काम करता आलं, असं राहुल म्हणाला. “तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट खेळता, तेव्हा फक्त एक खेळाडू म्हणूनच तुम्हाला आव्हानाचा सामना करावा लागत नाही, तुमच्या व्यक्तीमत्त्वाला सुद्धा आव्हानांचा सामना करावा लागतो” असं राहुल म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *