दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
(sports news) 3 जानेवारी 2024 रोजी टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टेस्ट सामना रंगणार आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात झालेल्या दारूण पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया तयार आहे. मात्र दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीमला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीमचा कर्णधार अचानक बदलण्यात आला असून या सामन्यात दुसऱ्या खेळाडूवर टीमची धुरा सोपवण्यात आली आहे.
हा खेळाडू करणार टीमचं नेतृत्व
ईएसपीएनने दिलेल्या बातमीनुसार, टेम्बा बावुमा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला आहे. बॉक्सिंग डेच्या सामन्यातही तो मैदानाबाहेर दिसला होता. टेम्बा बावुमाच्या अनुपस्थितीत सेंच्युरियनमध्ये 185 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळणाऱ्या डीन एल्गरकडे कारकिर्दीतील शेवटच्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेची कमान सोपवण्यात आलीये. बावुमाच्या जागी झुबेर हमजाचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या सामन्यात टेम्बाला झाली होती दुखापत
टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टेस्ट सामना सेंच्युरियनमध्ये खेळवण्यात आला होता. या टेस्ट सामन्याच्या 20व्या ओव्हरमध्ये बावुमाला दुखापत झाली. यावेळी लाँग-ऑफच्या दिशेने बॉलचा पाठलाग केला आणि बाऊंड्रीपूर्वी बॉल थांबवताना तो जखमी झाला. याचवेळी त्याला दुखापत झाली आणि तो मैदानातून निघून गेला. यावेळी त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आलं.
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कोत शुकरी कोनराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टेम्बाची स्थिती फारशी चांगली नाही. तो फलंदाजीसाठी तयार होता आणि आम्ही त्याच्या तब्येतीचं निरीक्षण करतोय. आम्हाला वाटलं की, जर त्याला मैदानावर फलंदाजीसाठी पाठवलं तर त्याची दुखापत आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. या सामन्यात जर आम्ही लवकर विकेट गमावल्या असत्या तर त्याने फलंदाजी केली असती. 150 रन्सने पुढे असल्याने फलंदाजीला पाठवलं नाही.
दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये बदल
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानची निवड केली आहे. आवेश खान दक्षिण आफ्रिकेविरोधातील वनडे सिरीजचा भाग होता. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 6 विकेट्स मिळवल्या होत्या. आवेशने 38 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 149 विकेट्स मिळवले आहेत. (sports news)
कशी असेल दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (विकेटकीपर), अभिमन्यु ईश्वरन, आवेश खान.