यूरिक अॅसिड ते टाचांचं दुखणं यावर हे फळ ठरेल संजीवनी
आपल्या शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. मग काही लोकांचे सांधे जड होतात, त्यांचे हात पाय दुखतात तर काही लोकांच्या पायाला सूज येते, त्यांना थकवा येतो किंवा त्यांच्या टाचा दुखतात. तर अशा समस्यांपासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर फळं (fruit) खाणं खूप गरजेचं आहे.
संत्री –
संत्री खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत होते. संत्रामध्ये विटामिन सी असते त्यामुळे ते आपल्या किडनीचे आरोग्य सुधारते तसेच यूरिक ॲसिडची पातळी देखील नियंत्रित करते. तसेच संत्री खाल्ल्यामुळे सांधेदुखी पासून देखील आराम मिळतो. सोबतच यूरिक ॲसिड वाढल्यानंतर टाच दुखत असेल तर संत्री खा यामुळे तुमची टाच दुखी देखील कमी होण्यास मदत होईल.
किवी –
जर तुमच्या शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही किवी जरूर खा. किवीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे युरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत करतात. किवीमध्ये पोटॅशियम, विटामिन सी, फोलेट, विटामिन ई असते जे यूरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरी –
स्ट्रॉबेरी यूरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते. स्ट्रॉबेरीमध्ये देखील विटामिन सी असते ज्यामुळे आपल्याला सांधेदुखी पासून आराम मिळतो. स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, कॅल्शियम, विटामिन सी, मॅग्नेशियम असे पोषक घटक असतात जे आपलं शरीर निरोगी ठेवतात आणि यूरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरीचा (fruit) रस देखील घेऊ शकता.
अननस –
अननस हा देखील युरिक ऍसिडची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत करतो. अननसामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते जे फायबर प्युरीन पचवण्यास मदत करते. जर तुम्हाला युरिक ऍसिडचा त्रास होत असेल तर अननसाचे सेवन जरूर करा. त्यामुळे तुमची यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत होईल.