6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल

नवीन वर्ष, नवा संकल्प हा विचार अनेकांचा असतो. अगदी आपली दिवसभराची सगळी काम सुरळीत होण्यासाठी अनेकजण टाइम टेबल बनवतात. असंच एक टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. एका आईने चक्क तिच्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतंय. हल्लीच्या मुलांचा बराचसा वेळा हा स्क्रिन टाइमममध्ये जातो. अशावेळी त्यांना शिस्त (discipline) लावण्यासाठी अशा टाइम टेबलची गरज असते.

6 वर्षाच्या मुलीचे वेळापत्रक

मुलीच्या आईने हे टाईम टेबल बनवले आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीला कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने ते तयार केलं आहे. अलार्मची वेळ सकाळी 7:50 आहे. यानंतर अंथरुणातून उठण्याची वेळ सकाळी 8.00 आहे. मुलं लहान असतात त्यांना उठताना थोडा वेळ मिळावा यासाठी आईने 10 मिनिटे जास्त दिली आहेत. यानंतर, ब्रश केल्यानंतर, नाश्ता, नंतर टीव्ही पाहणे, फळे खाणे, खेळणे आणि दूध पिणे असा उल्लेख आहे. यानंतर टेनिस खेळणे, गृहपाठ करणे, रात्रीचे जेवण करणे, साफसफाई करणे आणि झोपण्याच्या वेळेचा उल्लेख आहे.

यासोबतच आईने आणखी दोन खास गोष्टींचा उल्लेख केला आहे जर मूल दिवसभर गैरवर्तन, रडणे आणि काहीही न तोडता राहिल्यास तिला बक्षीस म्हणून 10 रुपये दिले जातील. मुलीला कोणताही खोडसाळपणा न करता टाइम टेबल पाळण्यास प्रवृत्त करण्यासाठी अतिरिक्त बक्षीस देणार असल्याचेही आईने सांगितले आहे. टाईम टेबलमध्ये असे लिहिले आहे की, जर मुलाने टाइम टेबलमध्ये 7 दिवस कोणताही खोडसाळपणा न करता घालवला तर तिला 10 रुपयांऐवजी 100 रुपये दिले जातील. सोशल मीडियावर लोक या टाइम टेबलला खूप पसंत करत आहेत.

मुलांना शिस्त महत्त्वाची

प्रत्येक पालकांचा असा अनुभव आहे की, मुलांना शिस्त लावणे अत्यंत गरजेची आहे. अशावेळी आईने तयार केलेले हे टाइम टेबल अनेक पालकांच्या पसंतीला येत आहे. पालक म्हणून त्यांना स्वतःला आणि मुलांना शिस्त (discipline) लावण्यासाठी हे नक्कीच मदत करेल. या आई प्रमाणे तुम्हालाही सुपर मॉम व्हायचं असेल तर अशा पद्धतीने टाइम टेबल नक्की बनवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *