टीम इंडियाच्या घोषणेनंतर पंड्याची सोशल मिडीयावर पहिली पोस्ट
(sports news) दक्षिण आफ्रिकेनंतर आता टीम इंडियाला अफगाणिस्तानच्या टीमचा सामना करायचा आहे. अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाला 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. या सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली गेली असून टी-20 च्या स्क्वॉडमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक झालं आहे. मुख्य म्हणजे गेल्या 1 वर्षापासून टी-20 मध्ये टीमची कमान सांभाळणार हार्दिक पंड्या या सिरीजचा भाग नाहीये. तो दुखापत ग्रस्त असून त्याने आता सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
टीमची घोषणा झाल्यानंतर पंड्याची पहिली पोस्ट
नुकतंच भारतात वनडे वर्ल्डकप खेळवण्यात आला. या वर्ल्डकपमधील एक सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. यानंतर हार्दिक पंड्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पंड्या यंदाच्या आयपीएलपासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे. अशातच हार्दिक पंड्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक ट्रेनिंग करण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हार्दिक पंड्याने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये हार्दिक जीममध्ये घाम गाळताना दिसतोय. या व्हिडीओला कॅप्शन देताना हार्दिक पंड्याने लिहीलंय की, एकाच दिशेला जायचं आहे, पुढे. दरम्यान हार्दिकची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
रोहित सांभाळणार टी-20 ची धुरा
गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न होता की, रोहित शर्माचं टी-20 च्या टीममध्ये कमबॅक होणार का? अखेर चाहत्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं. रोहित शर्माचं टी-20 टीममध्ये कमबॅक झालं असून विराट कोहली देखील टीमचा भाग असणार आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या सिरीजमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाची जबाबदारीही सांभाळणार आहे.
रोहितसोबत विराट कोहलीही 14 महिन्यांनंतर टी-20 टीममध्ये परतला आहे. 2024 च्या T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची T20 सिरीज असणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळायची आहे. (sports news)
अफगाणिस्तानविरूद्ध कशी असणार टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार