कोल्हापूर जिल्हा आदर्श टेम्पो रिक्षा असोसिएशन मार्फत प्रजासत्ताक दिन साजरा

प्रतिनिधी:-विजय पाटील

(local news) जयसिंगपूर येथील वैरण अड्डा येथे असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा आदर्श टेम्पो रिक्षा असोसिएशन मार्फत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करून भारताला पूर्ण प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले. देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झेंडा फडकवण्यात येतो. 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज शीर्षस्थानी बांधला जातो आणि तेथून ध्वज फडकवला जातो, याला ध्वज फडकवणे म्हणतात.

कोल्हापूर जिल्हा आदर्श टेम्पो रिक्षा असोसिएशन, वैरण अड्डा,जयसिंगपूर यांच्यामार्फत 26 जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न केला. यावेळी अध्यक्ष जुबेर बसरगे, उपाध्यक्ष गणेश चव्हाण, खजिनदार अमित नदाफ, सेक्रेटरी प्रकाश कोळी तसेच इतर देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. (local news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *