IPL मधील प्रसिद्ध क्रिकेटपटू अडचणीत
(sports news) एका प्रसिद्ध मॉडलने जीवन संपवलं. त्यामुळे IPL मध्ये खेळणारा एक नावाजलेला क्रिकेटपटू अडचणीत आलाय. ही मॉडल सूरतची राहणारी आहे. तिच नाव तानिया सिंह आहे. तिने आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. 28 वर्षाची तानिया फॅनश डिजायनिंग आणि मॉडलिंगच्या क्षेत्रात काम करायची. इन्स्टाग्रामवर तिचे 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने इन्स्टा बायोमध्ये लिहिलय की, ती एक डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडल आहे. तपासात समोर आलय की, आयुष्य संपवण्याआधी तिने शेवटचा कॉल क्रिकेटपटूला केला होता. पोलीस वेगवेगळ्या अँगलने चौकशी करत आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सनरायजर्स हैदराबाद (SRH) कडून खेळणारा अभिषेक शर्मा अडचणीत सापडला आहे. सूरतच्या स्थानिक पोलिसांनी चौकशीसाठी त्याला समन पाठवलय. तानियाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सूरतमध्ये आपला तपास सुरु केला. या दरम्यान IPL मधील SRH टीमचा खेळाडू अभिषेक शर्माच नाव समोर आलय. अभिषेक तानिया सिंहच्या संपर्कात असल्याच तपासात समोर आलय.
कधी जीवन संपवलं?
तानिया आणि अभिषेक मागच्या काही काळापासून संपर्कात नव्हते, हे सुद्धा तपासात दिसून आलय. पण चौकशीसाठी पोलिसांनी अभिषेकला सुद्धा बोलावलय. अभिषेक आणि तानियाच्या मैत्रीबद्दल पोलिसांना तपासातून माहिती मिळणार आहे. मॉडल तानिया रात्री उशिरा घरी परतली. त्यानंतर तिने जीवन संपवलं. तानियाच्या कुटुंबाला यामुळे मोठा धक्का बसलाय.
कॉल डिटेलमध्ये अनेक रहस्य
पोलीस सूत्रांनी सांगितलं की, तानियाच्या कॉल डिटेलमध्ये अनेक रहस्य आहेत. तिने शेवटचा कॉल सुद्धा अभिषेक शर्माला केला होता. जीवन संपवण्यामागे प्रेमसंबंध तर कारण नाही ना? या अँगलने पोलीस आता चौकशी करतायत. (sports news)
SRH ने किती कोटीला विकत घेतलेलं?
अभिषेक शर्मा IPL मध्ये सनराइजर्स हैदराबाद टीमकडून खेळतो. तो ऑलराऊंडर आहे. त्याने आयपीएलच्या 47 सामन्यात 137.38 च्या स्ट्राइक रेटने 893 धावा केल्या. 75 त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. आयपीएलमधेये त्याने आतापर्यंत 4 अर्धशतक झळकावली आहेत. 9 विकेट काढल्यात. अभिषेकला 2022 आयपीएल ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 6.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.