शेतकऱ्यांसाठी आली आनंदवार्ता! होणार मोठा फायदा

दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान चांगली बातमी येऊन धडकली आहे देशभरातील शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल. त्यांना पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याविषयी आनंदवार्ता मिळेल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये मिळतात. जे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत, त्यांना पण लॉटरी लागणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या (farmer) खात्यात जमा करण्याविषयी एक महत्वाची अपडेट दिली आहे.

पीएम किसानचा 16 वा हप्ता कधी जमा होणार ?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता 28 फेब्रुवारी, 2024 रोजी जमा करण्यात येणार आहे. या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसानच्या संकेतस्थळानुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ओटीपी आधारे ई-केवायसी, पीएम किसान पोर्टलवर करता येऊ शकते. या बायोमॅट्रिक आधारीत ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्रावर संपर्क साधता येईल.

आतापर्यंत खात्यात 2.8 लाख कोटी

मोदी सरकारने पहिल्या कालावधीत 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. ही योजनेची गोड फळं मोदी सरकारने चाखली. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या (farmer) खात्यात 15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी रुपये जमा केले.

योजनेसाठी असा करा अर्ज

pmkisan.gov.in या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल
‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
शेतीसंबंधीची माहिती जमा करा
सेव्ह बटणावर क्लिक करा
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल

असे करा eKYC

ओटीपी आधारे करा ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध)
बायोमेट्रिक आधारे ई-केवायसी तुम्ही CSC Center/ SSK वरुन करु शकता
फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी, मोबाईल ऐपवर उपलब्ध आहे.

पैसा आला की नाही खात्यात?

सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *