रस्त्याच्या कडेला लाल वर्तुळाच्या मध्यभागी पांढरे वर्तुळ, या चिन्हाचा अर्थ काय?

भारतात सुंदर अशा हिरव्यागार निसर्गात वळणा वळणाचे आणि रस्त्यावरुन प्रवास करणे हा अतिशय अविस्मरणीय अनुभव असतो. पण या रस्त्यावरुन प्रवास करताना दोन, तीन आणि चार चाकी वाहन चालवताना वाहतूक नियम हे प्रत्येकाला माहितीच पाहिजे. रस्त्याच्या कडेला असलेल्या साइन बोर्ड (Sign Board) वाहतूक नियमाचा एक भाग आहे. ते वाहनधारकांना माहिती असणं गरजेच आहे. सध्या सोशल मीडियावर एक साइन बोर्डची खूप चर्चा होते आहे. हा साइन बोर्ड नेमका आहे कसा आणि कुठे पाहिला मिळतो.

तर आम्ही सांगतो तुम्हाला सोशल मीडियावर जो साइन बोर्ड व्हायरल होतो तो म्हणजे लाल रंगाच्या वर्तुळात पांढरा रंगाचा (Red white circle road sign meaning) ज्यात काही लिहिलं नाही असा तो आहे.

या चिन्हाचा अर्थ काय आहे?

अहवालानुसार, या चिन्हाचा अर्थ असा आहे की, ज्या ठिकामी तुम्हाला हे साइन बोर्ड दिसतं त्या परिसरात तुम्ही वाहन नेऊ शकतं नाही (No Vehicle). बऱ्याचदा या चिन्हाच्या खाली आणखी एक चिन्ह किंवा माहिती लिहिलेली असते की, यात सहसा कोणत्या वेळी वाहन त्या परिसरात नेऊ शकत नाही हे लिहिलं असतं. त्या शिवाय या साइन बोर्डचा दुसरा अर्थ असाही असतो की वाहन नेण्यासाठी बंदी असली तरी त्या परिसरात तुम्ही सायकल चालवू शकता. त्यामुळे हा साइन बोर्ड दिसल्यास त्या ठिकाणी चुकूनही वाहन नेऊ नका.

भारतातही अशा चिन्ह आहे का?

भारतातही अशा अनेक साइन बोर्ड (Sign Board) दिसतात. त्यामधील काही साइन बोर्डचे अर्थ समजणं कठीण असतं. साधणार सर्वसामान्यांना समजेल असे साइन बोर्ड तयार करण्यात येतात. पण काही साइन बोर्ड काही लोकांना गोंधळात टाकतात. भारतात असंच एक साइन बोर्ड आहे. जे लाल रंगाचा पांढरा असा उलटा त्रिकोण असतो. ज्याचा अर्थ मागील वाहनांना पुढे जाण्याची संधी द्यावी.

कुठे आहे हे साइन बोर्ड?

हा साइन बोर्ड खरं तर ब्रिटनमध्ये (Britain road sign) दिसतो. तिथे तो फार सहज दिसतो. जर तुम्हाला ब्रिटनमध्ये कार चालवण्याची संधी मिळाली तर या साइन बोर्डकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा तुम्हा ही चूक महागात पडेल.

मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, हे चिन्ह ब्रिटनमध्ये सहज आपला दिसतं. गोलाकार लोखंडी बोर्डवर लाल वर्तुळ काढलेले एक पांढऱ्या रंगाचे वर्तुळ (Red white circle road sign meaning) असतं. अनेक वेळा या साइन बोर्डवर काहीही लिहिलेलं नसतं. तर कधी कधी या साइन बोर्ड खाली काही माहिती लिहिलेली असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *