भर मैदानात रोहितसोबत बाचाबाची? व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

(sports news) भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमध्ये 3 सामने भारताने जिंकली असून सिरीजवरही कब्जा मिळवला आहे. चौथी टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी संपली आणि टीम इंडियाने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात टीम इंडिया फलंदाजी करत असताना एक मोठी घटना घडली. इंग्लंडच्या टीमला हरताना पाहून एंडरसनने रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) एक विचित्र गोष्ट केली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि यशस्वी जयस्वाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आले होते. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी टीम इंडियाने एकंही विकेट गमावली नाही. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला देखील या दोघांनी चांगला खेळ केला. दरम्यान, एका प्रसंगी जेम्स अँडरसन रोहितशी ( Rohit Sharma ) बोलत असताना दिसला.

लाईव्ह सामन्यात संतापला जेम्स एंडरसन?

झालं असं की, 13व्या ओव्हरच्या सुरुवातील दुसऱ्या बॉलवर रोहितने ( Rohit Sharma ) एंडरसनला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याला यश आलं नाही. बॉल आतल्या बाजूला जाऊन मांडीच्या पॅडवर आदळला. यावेळी बॉल फार दूर नव्हता, त्यामुळे रोहितला ( Rohit Sharma ) रन घ्यावासा वाटला नाही. पण दुसऱ्या बॉलवर यशस्वी जयस्वाल डेंजर एन्डवर पोहोचत होता. रोहितने त्याच्या जोडीदाराचा कॉल नाकारण्याचा प्रयत्न केला, पण जयस्वाल 70 टक्क्यांवर पोहोचल्याचे त्याच्या लक्षात आलं. यावर रोहितनेही रन पूर्ण केला. दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजवर आल्यावर सर्वांनी जणू सुटकेचा नि:श्वास सोडला.

रोहितवर जेम्स एंडरसनची कमेंट

दरम्यान या दोघांचं वागणं जेम्स अँडरसनला फारसं आवडले नाही. रोहित नॉन स्ट्रायकरजवळ येताच एंडरसन भारतीय त्याच्याशी बोलताना दिसला. एंडरसनकडे पाहून असं दिसत होतं की, रोहितला ( Rohit Sharma ) कदाचित त्याच्या अशा अपेक्षा नव्हती. पण अँडरसनला जे काही म्हणायचंय ते ऐकून तो मागे हटला नाही. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून स्पष्ट होतं की, त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं होतं. (sports news)

रवी शास्त्रींकडून समजली संपूर्ण गोष्ट

यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये रवी शास्त्री यांनी याबाबत खुलासा केला. शास्त्रींनी सांगितलं की, दुसऱ्या टोकाला पोहोचताच एंडरसन आणि रोहित शर्मामध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली. तुम्ही नेहमी कोणताही फायदा करून घेण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी प्रतिस्पर्ध्याच्या आत जाता. मग तो फलंदाज असो वा गोलंदाज. खेळाडू जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *