‘या’ 2 खेळाडूसाठी एक्सपर्ट्समध्ये वादविवाद सुरु
(sports news) भारतीय क्रिकेटमध्ये मॅच व्यतिरिक्त अन्य कुठल्या मुद्यावर सर्वाधिक चर्चा होते, तर तो आहे सिलेक्शन. सिलेक्शनच्या मुद्यावर फॅन्स आणि एक्सपर्ट वेळोवेळी आपली मत मांडत असतात. यावेळी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवरुन चर्चा, वादविवाद सुरु आहेत. यात काही खेळाडूंना प्रमोट करण्यात आलय. काहींना डिमोट करण्यात आलय. काही नवीन चेहरे आहेत. काही मोठ्या नावांना स्थान मिळालेलं नाहीय. सर्वाधिक चर्चा इशान किशन आणि श्रेयस अय्यरला बाहेर करण्याची होतेय. पण असेही 2 खेळाडू आहेत, ज्यांच्यावरुन एक्सपर्ट्समध्ये वादविवाद सुरु आहेत.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बुधवारी 28 फेब्रुवारीला आपल्या सेंट्रल कॉन्ट्रेक्टची घोषणा केली. यात 30 खेळाडूंसोबत वेगवेगळ्या ग्रेडमध्ये एकवर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलय. यात मागच्यावर्षीची बहुतांश नाव आहेत. पण काही खेळाडूंची स्थिती बदललीय. BCCI ने सांगूनही रणजी ट्रॉफी न खेळणाऱ्या श्रेयस अय्यर आणि इशान किशनला बाहेर करण्यात आलय. त्याचवेळी यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंह आणि तिलक वर्मा यांची पहिल्यांदा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री झालीय.
टीम इंडियाचे हे दोन्ही सिनियर खेळाडू
याच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील दोन खेळाडूंच्या ग्रेडवरुन फॅन्समध्ये वेगवेगळी मत आहेत. त्यावरुन वादविवाद सुरु आहे. हे 2 प्लेयर आहेत, रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्या. टीम इंडियाचे हे दोन्ही सिनियर आणि महत्त्वाचे खेळाडू आहेत. नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे दोन्ही खेळाडू A ग्रेडचा भाग आहेत. A+ नंतर A ग्रेड येते. A+ मधील खेळाडूंना वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. दोघांच प्रदर्शन पाहता, या चर्चेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
नियमानुसार कुठले खेळाडू A+ चा भाग
अश्विनने इंग्लंड विरुद्ध चालू टेस्ट सीरीजमध्ये 500 विकेटचा टप्पा पार केला. अश्विन या फॉर्मेटमध्ये नंबर 1 गोलंदाज आहे. मागच्या काही वर्षांपासून अश्विन A ग्रेडमध्ये आहे. हेच एक्सपर्ट्स आणि फॅन्सना मान्य नाहीय. अश्विनला सुद्धा रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजासोबत A+ ग्रेडमध्ये ठेवायला पाहिजे होतं. BCCI च्या ग्रेडिंग नियमानुसार, तिन्ही फॉर्मेटमधील महत्त्वाचे खेळाडू A+ चा भाग आहेत. (sports news)
या प्लेयरला A+ का नाही?
हार्दिक पांड्याला सुद्धा A ग्रेडमध्ये ठेवलय. हार्दिक पांड्याला मागच्यावर्षी वर्ल्ड कप दरम्यान चार सामने खेळल्यानंतर दुखापत झाली. तेव्हापासून तो टीमच्या बाहेर आहे. IPL मधून तो मैदानावर पुनरागमन करेल. त्यानंतर T20 वर्ल्ड कप खेळणार आहे. त्याच्या फिटनेसबद्दल मनात संशय कायम असेल. हार्दिकच्या A+ मधील समावेशाबद्दलही मतमतांतर आहेत. हार्दिक पांड्याच्या नावाचा आगामी T20 आणि वनडे टीमचा कॅप्टन म्हणून विचार होतो. अशावेळी या प्लेयरला A+ का नाही? असा प्रश्न विचारल जाण स्वाभाविक आहे.