इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडियात 2 बदल
(sports news) इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात धर्मशाला येथे टॉस जिंकला आहे. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. तर टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केलेत. टीम इंडियाकडून एका युवा खेळाडूला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विन याचा हा कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना आहे. अश्विनला या विषेश कामगिरीनिमित्त त्याला सामन्याआधी एक स्पेशल कॅप देण्यात आली. तसेच इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो याचाही हा 100 वा सामना आहे.
दोन्ही संघात बदल
इंग्लंडने सामन्याच्या एक दिवसआधी 6 मार्च रोजी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली. त्यानुसार इंग्लंडने 1 बदल केला. ऑली रॉबिन्सन याच्या जागी मार्क वूड याला संधी देण्यात आली. तर त्यानंतर टीम इंडियात 2 बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह परतल्याने आकाश दीप याला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर रजत पाटीदार याला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलंय. त्याच्या जागी देवदत्त पडीक्कल याला 23 वर्षीय युवा फलंदाजाला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. देवदत्त टीम इंडियाकडून पदार्पण करणारा 314 वा भारतीय ठरला आहे.
टीम इंडिया विजयी चौकारासाठी तयार
दरम्यान टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडिया पाचवा सामना जिंकून मालिकेत विजयी चौकार लावण्यासाठी तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला हा सामना जिंकून इंग्लंडचा भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता यापैकी नक्की कोण यशस्वी ठरतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. (sports news)
इंग्लंडने टॉस जिंकला
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.