मुंबई इंडियन्सला धक्का, IPL पूर्वीच हार्दिक पांड्याची डोकेदुखी वाढली
(sports news) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ सुरू होण्यापूर्वीच हार्दिक पांड्याची डोकेदुखी वाढली आहे. आयपीएल सुरू होण्यास एक आठवडापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि त्याआधीच संघातील स्टार गोलंदाज जखमी झाला आहे. श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंका हा तीन ट्वेंटी-२०, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर होता, जिथे त्याला दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे आणि तो पुनर्वसनासाठी घरी परतणार आहे.
दुसऱ्या वन डेत गोलंदाजी करताना दिलशान हाताच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्याला त्याचे षटकही पूर्ण करता आले नाही. आता तो आयपीएलचे सुरुवातीचे सामनेही खेळणे कठीण आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई २४ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीतून मोहिमेची सुरुवात करेल. मदुशंका मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण करणार होता, मात्र आता त्याला प्रतीक्षा करावी लागेल. २०२४ च्या आयपीएल लिलावात मदुशंकाला मुंबईने ४.६० कोटींत आपल्या ताफ्यात घेतले होते. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दिलशानने श्रीलंकेसाठी सर्वाधिक बळी घेतले होते.
मुंबई इंडियन्स – हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद (sports news)
मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक
२४ मार्च – गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२७ मार्च – सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
१ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
७ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
बांगलादेश दौऱ्यावर त्याला ट्वेंटी-२० सामन्यात यश मिळू शकले नाही, परंतु पहिल्या दोन वन डे सामन्यांमध्ये त्याने ४ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या वन डेत तो केवळ ६.४ षटके टाकू शकला, ज्यामध्ये त्याने दोन विकेट घेतल्या. मदुशंकाची दुखापत हा श्रीलंकेसाठीही मोठा धक्का आहे, कारण तीन सामन्यांची वन डे मालिका १-१ अशी बरोबरीत आहे आणि शेवटचा सामना १८ मार्च रोजी होणार आहे.