डी के टी ई वाय सी पी च्या दोन विद्यार्थ्यांची स्पार्क मिंडा लि. पुणे या नामांकित कंपनीत ४.५ लाख पॅकेजवर निवड
इचलकरंजी येथील डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निकच्या २ विद्यार्थ्यांची स्पार्क मिंडा लि. पुणे या नामांकित कंपनीत ४.५ लाख रुपये पॅकेजवर निवड झाली आहे. तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील प्रथमेश पाटील व तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील सायली खाडे यांची निवड झाली आहे. स्पार्क मिंडा कंपनीतर्फे नुकताच कॅम्पस इंटरव्ह्यूव आयोजित केला होता. त्यामधून या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूव प्रोसेस मध्ये टेक्निकल राऊंड एप्टीटयुड टेस्ट तसेच पर्सनल एचआर इंटरव्ह्यूव इत्यादी फेऱ्या घेण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड झाली. स्पार्क मिंडा ही कंपनी सहा दशकांहून अधिक काळ जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगातील महत्त्वपूर्ण कंपनी आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी स्पार्क मिंडा ने आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या ॲक्सेसरीज, डायकास्टिंग, इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्यूशन, इंटेरियर प्लास्टिक, ड्रायव्हर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम, स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि स्टार्टर मोटर याची निर्मिती करते. डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो. विद्यार्थ्यांच्या नामांकित कंपनीतील या निवडीने डीकेटीईच्या दर्जेदार तंत्रशिक्षणावर गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. पॉलिटेक्निकने स्थापनेपासूनच उत्कृष्ट प्लेसमेंटची परंपरा जोपासली असल्याचे मनोगत मानत सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व संचालकांचे सहकार्य लाभले. सदरच्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, उपप्राचार्य प्रा. बी. ए. टारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. बी. चौगुले डीकेटीई च्या कार्यकारी संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे, विभाग प्रमुख प्राध्यापक व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.