डी.के.टी.ई.आय.टी.आय च्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी % दि.
डि.के.टी ई. सोसायटीच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील आय.टी.आय मध्ये अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या फिटर ट्रेड मधील १)सुभाष विधाते २)अफ्ताब मुजावर ३)सर्वेश दौंडे ४)ओंकार कौलगे ५)ओंकार पवार ६)वरद पाटील या सहा प्रशिक्षणार्थ्यांची आणि वेल्डर ट्रेड मधील १)श्रीवर्धन निगडे २)विवेक अदाते ३)अजित कट्टीमनी या तीन विद्यार्थ्यांची तसेच इलेक्ट्रिशियन ट्रेड मधील १)कु. अदिती कांबळे या एका प्रशिक्षणाथिनीची अशा एकूण दहा प्रशिक्षणार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे येथील नामांकित कंपनीमध्ये अप्रेंटीसशिप या पदाकरिता निवड झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दर्जेदार औद्योगिक प्रशिक्षणाबरोबरच उत्कृष्ट प्लेसमेंटची परंपरा या आय.टी.आय ने जोपासली आहे येथे घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा औद्योगिक प्रशिक्षणांबरोबर उद्योगांना आवश्यक असणाऱ्या गुणवत्तेने परिपूर्ण होतो या आय.टी.आय मध्ये प्रशिक्षण देत असताना मूलभूत ज्ञानाबरोबर प्रगत ज्ञान सुद्धा दिले जाते त्यामुळे येथील प्रशिक्षणार्थी ॲडव्हान्स मशीन स्वतः हाताळू शकतात यासाठी या विद्यार्थ्यांना डि.के.टी.ई. सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय मा.श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), उपाध्यक्ष विद्यमान आमदार आदरणीय मा.श्री. प्रकाशराव आवाडे (आण्णा), मानद सचिवा मा. डॉ. सौ. सपना आवाडे (वहिनी) व सर्व संचालक मंडळाचे बहुमोल सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री. ए. पी. कोथळी तसेच आय.टी.आय चे प्राचार्य श्री. डी. डी. पाटील व टी.पी.ओ. श्री. आर. आर. मगदूम तसेच सर्व आय.टी.आय स्टाफ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल समाजाच्या सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.