कोल्हापूर : “इथलं राजकारण इतकं खालच्या पातळीवर जाईल अस वाटलं नव्हतं’

(political news) कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं चांगलाच जोर लावला आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित युवा मेळाव्यात पवार यांनी भाजपवर चौफेर हल्लाबोल केला. “मला वाटलं होतं, भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील असतील” अशा शब्दांत यावेळी पवार यांनी पाटलांवर टीका केली.

पवार म्हणाले, “इथलं राजकारण इतकं खालच्या पातळीवर जाईल अस वाटलं नव्हतं. एखाद्या मातेला, महिलेला इथं कमी लेखलं जातंय. तुम्ही एका महिलेबाबत बोलता तेव्हा तुमची सर्वच महिलांबाबत तीच भूमिका असते. भाजपाचे नेते महिलांबाबत जसा विचार करतात तो शाहूंची भूमी कदापी स्वीकारणार नाही. अंबाबाई मंदिरात घोटाळा करुन ज्यांनी मंदिरालाही सोडलं नाही ते काय विकास करणार. मला वाटलं होतं इथं भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील असतील पण तसं झालं नाही” (political news)

शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचं स्मारक व्हावं अशी महाविकास आघाडीचीही भूमिका आहे. त्यामुळे त्याठिकाणी शाहू स्मारक होणारच असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला. कोल्हापूरातील एमआयडीसीत आयटी पार्क व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इथल्या मुलांना रोजगार मिळावा म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत. भविष्याकडे आपण बघतो तेव्हा इतिहासही बघितला पाहिजे. कोल्हापूर देशाला विचार दिला आहे, हा विचार म्हणजे समतेचा, सर्वधर्म समभावाचा विचार आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी युवा मेळाव्यात युवा नेत्यांना, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *