शाळा-महाविद्यालये बंद या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई
शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करू, असा इशारा राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी संयमाने घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 15 फेब—ुवारीपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी विरोध केला आहे. प्रसंगी याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही शाळा व्यवस्थापनांनी दिला आहे. याबाबत विचारता पाटील म्हणाले, शाळांना शासकीय आदेशाचे पालन करावे लागेल. सरकारने हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. यानंतरही कोणी शाळा सुरूच करणार असेल आणि राज्य शासनाचे आदेश पाळणार नसेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यावेळी महेश पोळ, के. डी.पाटील, एन. एन. काझी, नितीन पाटील, एम. आर. पाटील, विल्सन वास्कर, पी. आय. बोटे आदी उपस्थित होते.कोरोना लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्य आस्थापनांना दिलेल्या सवलतींप्रमाणे कोरोना नियमांची आवश्यक ती अंमलबजावणी करत इंग्रजी शाळा 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी द्यावेत; अन्यथा तीव— आंदोलन करण्याचा इशारा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे (इम्सा) अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले आहे.