अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम किसान सन्मान’चा निधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ( PM-Kisan scheme) १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात १० वा हप्ता जमा करण्यात आला होता. परंतु,उत्तर प्रदेशातील तब्बल ७ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या शेतकर्यांना ही रक्कम परत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. इतर स्त्रोतातून होणाऱ्या कमाईवर प्राप्तीकर भरत आहे. अथवा योजनेअंतर्गत मदत प्राप्त करण्यास पात्र नाही अशा अपात्र शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे.पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ( PM-Kisan scheme) उत्तर प्रदेशमधील २.५० कोटी पात्र लाभार्थी आहेत. मात्र अपात्र शेतकर्यांच्या खात्यात निधी जमा झाल्याची बाब समोर आली आहे. विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी शेतकर्यांना हा निधी परत करावा लागेल. निवडणूक संपल्यानंतर स्वत:हून पैसे परत करण्यासाठी अथवा वसुली नोटीस शेतकर्यांना बजावण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.पैसे परत करण्यास या शेतकर्यांनी नकार दिल्यास त्यांच्यावर केंद्राकडून कायदेशीर कारवाई देखील केली जावू शकते. पंरतु, ऐन विधानसभा निडणुकीच्या तोंडावर राज्यातील एवढ्या मोठ्या संख्येत अपात्र शेतकर्यांच्या खात्यात हा निधी कसा हस्तांतरित करण्यात आला? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.