समडोळी येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण

समडोळी येथील अमूकक्षिद्ध व रेणुका देवी मंदिरापासून शेती व नदी पात्राकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्री साडेसात हे आठच्या सुमारास तीन फुटी मगर (crocodile) आढळली. दरम्यान, यामुळे ग्रामस्थ व शेतकर्‍यांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे. दरम्यान, या घटनेने काही दिवसांपूर्वी गावात पकडलेल्या मगरीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

हा सारा रस्ता चिखल व दलदलीचा आहे. या भागात एका शेतकर्‍यास तीन फुटी मगर (crocodile) नागरी वस्तीत दिसली. त्याने तातडीने प्राणी मित्र ओंकार कोळी यांना सांगितली. कोळी यांनी या मगरीस पकडून तातडीने नदीपात्राच्या अधिवासात सोडून दिल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची भावना उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, गावखणीमध्ये मगरींचे दर्शन यापूर्वी ग्रामस्थांना घडले आहे. या प्रश्नी ग्रामस्थांनी वन विभागाकडे मगरींच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून जळजळीत भावना व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *