संभाजी भिडेंची राजकारण्यांवर जहरी टीका; “खासदार-आमदार हे…..”‘

खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक (stigma) आहेत,अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. तसेच सर्वधर्म हा गांडुळ विचार असून तो इतिहासाला धरून नसल्याचे मतही भिडे यांनी व्यक्त केले. ते बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौड समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह शब्दांत राजकारण्यांवर टीका केली. भिडे गुरुजी यांनी खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी देशाला लागलेले कलंक असल्याची टीका केली आहे. सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे, हा सत्य विचार नसून असत्य विचार आहे,हा इतिहासाला धरून विचार नाही,असे मत व्यक्त करत आपल्या मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहीजे आहेत,पण इथेचं बोंब आहे.साधी गोष्ट घ्या,लोक निवडून देतात ,ते आमचे खासदार काय ? आमदार काय, लोकप्रतिनिधी काय ? शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात,भाडोत्री. हे बेकार असून आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक (stigma) आहेत,अशा शब्दांत भिडे गुरुजी यांनी टीका केली.

सांगलीत नवरात्राच्या काळात दुर्गामाता दौडीच आयोजन करण्यात येते. हजारो धारकरी दौडीत सहभागी झाले होते. विजयादशमीच्या दिवशी रिवाजाप्रमाणे शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली. संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३५ वर्षांपासून सांगलीत दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे दोन वर्षे ही दौड होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *