मिरज : रेल्वे गाड्यांचा विस्तार लालफितीत

रेल्वेकडून मिरज रेल्वे स्थानकाची नेहमीच उपेक्षा होत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षात मिरज रेल्वे स्थानकातून एकही नवी गाडी सुरू केलेली नाही. तसेच गाड्यांचा मिरजेपर्यंत विस्तारदेखील केलेला नाही. त्यामुळे पुणे आणि हुबळीपर्यंत धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा विस्तार करून मिरजेतून नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे.

मिरज रेल्वे स्थानकातून पुणे, सोलापूर, बेळगाव आणि कोल्हापूर या चारही मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु रेल्वे गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासह रेल्वे गाड्यांचा विस्तार करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मिरज रेल्वे कृती समितीसह रेल्वे प्रवासी संघटनांची आहे.

जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, जत, वाळवा तालुक्यातील अनेकजण लष्करात आहेत. अनेकांची नियुक्ती उत्तर भारतात आहे. त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मिरज, सांगलीतून एक्स्प्रेसने पुण्यापर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यानंतर तेथून दुसऱ्या एक्स्प्रेसने प्रवास करावा लागत आहे. भारतीय जवानांसह उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना थेट रेल्वे मिळावी, यासाठी पुणे- जम्मू तावी झेलम एक्स्प्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार करण्याची अनेक वर्षापासून मागणी आहे. त्यामुळे तिचा विस्तार करण्याची गरज आहे. या गाडीसह पुणे – दानापूर पाटणा एक्स्प्रेस, पुणे हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, म्हैसूर- धारवाड एक्स्प्रेस, हुबळी-चेन्नई आणि पुणे-अहमदाबाद या एक्स्प्रेसचे मिरजेपर्यंत विस्तारीकरण गरजेचे आहे.
मिरज रेल्वे स्थानकातून नव्या गाड्या सुरू करण्याची देखील गरज आहे. तसेच बेळगाव- पुणे इंटरसिटी एस्क्प्रेस मिरज-हरिद्वार, मिरज- गुवाहाटी, मिरज-मंगलोर आणि मिरज-कन्याकुमारी इत्यादी गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. वरील सर्व गाड्यांचे विस्तारीकरण आणि नवीन गाड्या सुरू झाल्यास मिरज रेल्वे स्थानक मध्यावधी स्थानक होण्याची शक्यता आहे. पुणे-जम्मूतवी एक्स्प्रेसचे विस्तारीकरण आणि मिरज- कन्याकुमारी एक्स्प्रेस नव्याने सुरू झाल्यास मिरज उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडणारे रेल्वेचे केंद्र बनणार आहे. मात्र, यासाठी रेल्वेकडून नेहमीच विविध कारणे देण्यात येत मिरज रेल्वे स्थानकातून नव्या गाड्या सुरू करण्याची देखील गरज आहे. तसेच बेळगाव- पुणे इंटरसिटी एस्क्प्रेस मिरज-हरिद्वार, मिरज- आहेत..

पुणे विभागाच्या उदासीनतेने हुबळी विभाग हतबल
कोरोनानंतर रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु दक्षिण- पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात येत असणाऱ्या गाड्यांना मिरजेत येण्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून नकार देण्यात आला होता. त्यासाठी राज्य सरकारचे कारण पुढे करून विविध कारणे देण्यात आली होती. पुणे विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हुबळी विभागाने मिरजेपासून काही अंतरावर असणाऱ्या विजयनगर स्थानकापर्यंत रेल्वेगाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे मिरज रेल्वे स्थानकाचे महत्व कमी होण्याच्या मार्गावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *