सांगली : वसंतदादा कारखान्याचा पेट्रोलपंप सील
वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगारांची फंड ग्रॅजुटीची कोट्यवधी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. ती देण्यासाठी साखर कारखाना जमिनीचा लिलाव काढला होता.मात्र लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तहसीलदारांनी कारखान्याचा पेट्रोल पंप सील करून ताब्यात घेतला आहे. आज ( दि. १६) सकाळी ही कारवाई करण्यात आली.