सांगली : प्लास्टिक वापराने रस्ते… महापालिकेचा पॅटर्न

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. प्रमुख चार रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर केला आहे. प्लास्टिकचा वापर रस्त्यांच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे. पर्यावरण संवर्धनातील ते एक महत्त्वाचे पाऊलही आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर सुरू केल्यास जिल्ह्यात प्लास्टिक कचर्‍याची समस्याच शिल्लक राहणार नाही.‘माझी वसुंधरा आणि आझादी का अमृतमहोत्सव’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका अनेकविध उपक्रम राबवित आहे. पर्यावरण संवर्धन, पर्यावरण पूरक उपाययोजना राबविल्या जात आहेत. रस्ते डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर हा महापालिकेचा एक आगळावेगळा आणि हटके उपक्रम ठरत आहे. राज्य शासनानेही या उपक्रमाची दखल घेतली आहे. महापालिकेचे कौतुकही केले आहे.
‘माझी वसुंधरा आणि आझादी का अमृतमहोत्सव’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका अनेकविध उपक्रम राबवित आहे. पर्यावरण संवर्धन, पर्यावरण पूरक उपाययोजना राबविल्या जात आहेत. रस्ते डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर हा महापालिकेचा एक आगळावेगळा आणि हटके उपक्रम ठरत आहे. राज्य शासनानेही या उपक्रमाची दखल घेतली आहे. महापालिकेचे कौतुकही केले आहे.
झुलेलाल चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक ते शंभरफुटी रस्ता, कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलिस चौकी, आपटा पोलिस चौकी ते काँग्रेस भवन तसेच सूतगिरणी ते कुपवाड या रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर केला आहे. श्रेडिंग मशीनवर तुकडे केलेले प्लास्टिक सध्या चार हॉटमिक्स प्लँटना पुरवले जात आहे. पण सध्या श्रेडिंग युनिटवर प्लास्टिकच शिल्लक नाही. प्लास्टिक गोळा करण्याचे काम सुरू आहे. हॉटमिक्स प्लँटवरील डांबराच्या मिश्रणाचे तापमान 165 अंश सेल्सिअस इतके असते. प्लास्किटचा विलय बिंदू 82 अंश सेल्सिअस आहे. डांबर व प्लास्टिकचे एकजीव मिश्रण रस्त्यांची मजबुती वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरते आहे. प्लास्टिकमुक्तीतून पर्यावरण संवर्धनाचा हा पॅटर्न अन्य यंत्रणांनी राबविणे गरजेचे आहे. तसेच तो आदर्शवत देखील ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *