400 दिवसांच्या स्पेशल FD वरुन कमाईची आणखी एक संधी!

तुम्हालाही एफडीमध्ये गुंतवणूक (investment) करायची असेल, तर तुम्ही ती देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करू शकता. ग्राहकांना अधिक लाभ देण्यासाठी बँकेने अमृत कलश ही विशेष एफडीयोजना सुरू केली होती. ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी 30 जून होती. जी बँकेने आता 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना जास्त नफा कमावण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज (interest) दिले जातेय. बँकेने 15 फेब्रुवारी 2023 रोजी ही विशेष FD योजना सुरू केली होती. अमृत ​​कलश डिपॉझिटमध्ये प्रीमेच्योर आणि लोनची सुविधा देखील समाविष्ट आहेत. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल…

400 दिवसात मिळेल जबरदस्त व्याज

SBI वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्किम ज्याला अमृत कलश नावाच्या ओळखलं जातं, ती 400 दिवसांची असते. सामान्य व्यक्तींसाठी व्याज दर 7.10 टक्के आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर बँकेच्या विशेष वी केअर योजनेपेक्षा जास्त आहे. SBI We care फिक्स्ड डिपॉझिटचा कार्यकाळ 5-10 वर्षे असतो. यामध्ये व्यक्तीसाठी 6.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के व्याजदर (interest) मिळतो.

व्याज आणि टॅक्स

या योजनेवर मासिक, त्रैमासिक आणि सहामाही अंतराने व्याज दिले जाईल. टीडीएस कापल्यानंतर स्पेशल एफडी स्कीमवरील मॅच्युरिटी व्याज ग्राहकाच्या अकाउंटमध्ये जोडले जाईल. एसबीआय अमृत कलश योजना अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना त्यांचे पैसे 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी कुठेतरी गुंतवायचे आहेत. अमृत ​​कलश डिपॉझिटमध्ये प्रीमेच्योर आणि लोन सुविधा देखील देखील समाविष्ठ आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, FD ची रक्कम मुदतीपूर्वी काढल्यास, डिपॉझिटच्या वेळी लागू होणाऱ्या व्याजदरावर 0.50% ते 1% दंड आकारला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *