आरबीआयची येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई

रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील दोन बड्या बँकांवर कारवाईचा बडगा उघारला आहे. त्यानुसार आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई केली आहे. या मोठ्या बँकांवर कारवाई केल्यानंतर त्यांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. बँकिंग रिझर्व्ह बँकेने सांगितले की, दंड ठोठवण्यात आलेल्या बँका मध्यवर्ती बँकेच्या अनेक महत्त्वपूर्ण नियमांचे उल्लंघन करत आहेत. या नियमांचे पालन न केल्याने येस बँकेला ९१ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दंड ठोठवण्यात का आला ?

येस बँक आणि आयसीआयसीआय बँक अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याने आरबीआयने(RBI) सांगितले. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँकेवर ग्राहकांच्या सेवा तसेच कार्यालयीन खात्यांशी निगडित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक काळात आरबीआयसमोर अशी अनेक प्रकरणे आली,ज्याक बँकेने अपुऱ्या शिलकीमुळे ग्राहकांच्या खात्यांमधून शुल्क वसूल केले शिवाय कार्यालयीन खात्यांमधून बेकायदेशीर कामे केली जात होती.

आरबीआयने केलेल्या मूल्यांकनात असे समजून आले की, येस (yes-bank)बँकेने गेल्या २०२२ या वर्षात अनेकदा नियमांचे उल्लंघन केले. या बँकेने आपल्या अनेक ग्राहकांच्या नावाने काही अंतर्गत खाती उघडली असून ती चालवण्यातही आली होती. त्यामुळे बँकेला तब्बल ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे

आयसीआयसीआय बँकेवर काय केले ?

आयसीआयसीआय बँक आणि ऍडव्हान्सशी संबंधित अनेक निर्देशांते उल्लंघन केल्याने दोषी आढळली. त्यासाठी बँकेला तब्बल एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बँकेने पूर्ण तपास न करता अनेक कर्ज मंजूर केले ,त्याचमुळे आर्थिक धोक्याचा सामना करावा लागला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *