रिकाम्या पोटी काकडीचा ज्यूस प्या अन् मिळवा अगणित फायदे
काकडी ही पौष्टिक मानली जाते. अनेक जण सलाड म्हणून काकडी खाणे पसंत करतात. तर, काकडीच्या पाण्यामुळं शरीरा डिटॉक्स होण्यास मदत (help) होते. व्यायामानंतर पाण्यात काकडी टाकून ते पाणी प्यायल्याने हायड्रेट राहण्यास मदत होते. रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे अधिक फायदे आहेत. जाणून घेऊया काकडीचे आरोग्यासाठी होणारे फायदे
शरीर डिटॉक्स राहते
काकडीचे पाणी, सलाड रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. त्याचबरोबर शरीर डिटॉक्स राहण्यास ही मदत होते. यामुळं रोग प्रतिकार शक्तीदेखील वाढते.
वजन कमी करते
काकडीचा रस पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काकडीचे पाणी किंवा रस प्या.
अँटी ऑक्सिडेंट
काकडीत असलेल्या अँटी ऑक्सिडेंट गुणधर्मामुळं शरीराला अनेक लाभ मिळतात. काकडीच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळं तुमच्या शरीरातील पेशींना होणारे नुकसान कमी करण्यास मदत (help) करतात.
रक्तदाब
रक्तदाब वाढण्याचे मूळ कारण म्हणजे आहारात सोडियमची अधिक मात्रा व त्या तुलनेत पॉटेशियमची मात्रा कमी असणे. काकडीच्या रसात मोठ्या प्रमाणात पॉटेशियम आढळते त्यामुळं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
त्वचा
रिकाम्या पोटी काकडीचा रस प्यायल्याने त्वचा उजळते. कारण काकडीचा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकतो त्यामुळं त्वचा साफ आणि निरोगी राहते.