शांत झोप हवी आहे? रात्री दूधात ‘हा’ एक पदार्थ टाकून करा सेवन, नक्कीच मिळेल फायदा

बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या फिटनेस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. करीनाला अनेक लोक फिटेस्ट मॉम असे देखील बोलतात. मात्र, तिचा या प्रवासात सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरच्या स्पेशल डायटची मदत झाल्याचे तिने अनेकदा मान्य करताना दिसते. रुजुता या फक्त करीनाच्या न्यूट्रिशनिस्ट नाही तर चांगली मैत्रिण देखील आहे. करीना बऱ्याचवेळा रुजुताकडे जेवायला देखील जाते. दरम्यान, रुजुतानं फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये खुलासा केला की करीना तिच्या प्रेग्नंसीनंतर आता दर 2 तासांनी जेवते, ज्यामुळे तिला शांत आणि आनंदी राहण्यास मदत झाली. करीना झोपण्यापूर्वी थोडे जायफळ-मिश्रित दूध प्यायची, कारण त्यानं शांत झोपायला मदत (help) करते.

जायफळाचे आयुर्वेदिक फायदे

आयुर्वेदानुसार, शरद ऋतूतील आणि हिवाळ्यात जायफळ विशेषतः फायदेशीर आहे. जायफळात अशी संयुगे असतात जी मध्यवर्ती मज्जासंस्थेला संतुलित ठेवतात, विश्रांतीला प्रोत्साहन देतात आणि तणाव कमी करतात. त्यामुळे तणाव कमी करण्यातच मदत होते आणि त्यासोबत पाचन क्रिया चांगली राहते.

मूड राहतो चांगला

अभ्यासातून असे दिसून आले आहे की जायफळ नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. हे तणाव कमी करते आणि मनःस्थिती सुधारते.

सांधे आणि स्नायू दुखण्यापासून आराम

जायफळात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात आणि मोनोटेरपीन्स नावाच्या संयुगाची उच्च पातळी देखील असते, ज्यामुळे जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे सांधेदुखी आणि जळजळ यापासून आराम मिळू शकतो.

गाढ झोप प्रेरक

आयुर्वेदिक औषधांमध्ये, जायफळ दीर्घकाळापर्यंत नैसर्गिक झोपेसाठी मदत (help) म्हणून वापरले जात आहे. हे मन शांत करते आणि शरीराला आराम देते, गाढ आणि शांत झोप मिळते. अतिरिक्त फायद्यांसाठी, तुम्ही जायफळ-मिश्रित दुधात काही बदाम आणि चिमूटभर वेलची देखील घालू शकता.

कसं घ्याव जायफळ दूध

जायफळ कोणत्याही पदार्थात टाकल्यास त्याची चव लगेच बदलते. ¼ ते ½ चमचा इतकंच जायफळ पावडरचे सेवन करण्यास सांगितले आहे. जायफळ दूध कसं बनवाल 1 कप दूधात, 1/2 टीस्पून जायफळ पावडर, मध किंवा साखर, चवीनुसार घाला आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण 2-3 मिनिटे मंद आचेवर गरम करा आणि मग या चविष्ठ दुधाचा आनंद घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *