‘…तर सभागृहात पुरावे देणार’; सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी विरोधक आक्रमक
(political news) भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. दरम्यान आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे प्रकरण सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात यापूर्वीही काही महिलांनी आमच्या नेत्यांशी संपर्क केला असून सभागृहात संधी मिळाली तर पुरावे देणार असल्याची माहिती दिली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, काल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपा साधनशुचिता, संस्कृतीच्या गप्पा मारते, यामध्ये यापूर्वीच महिना दोन महिन्यांपूपासून काही महिलांनी आमच्या महिला नेत्यांशी संपर्क केला आहे. या महिला किरीट सोमय्या यांचे वेगवेगळे विषय समोर आणतील.
किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांकडे चोकशीची मागणी केली असेल तर त्याचं स्वागत आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करावी. तसेच सभागृहात संधी मिळाली तर योग्य ते पुरावे देईन असेही अंबादास दानवे म्हणाले.
किरीट सोमय्यांचं फडणवीसांनी पत्र
या प्रकरणी चौकशीची मागणी करणारं पत्र सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीलं आहे. “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”
“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी” असं पत्रात किरीट सोमय्या म्हणाले आहेत. litical news)
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान आजच्या दिवसाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेबद्दल देखील भाष्य केलं. दानवे म्हणाले की, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेसाठीची याचिका आम्ही सचिव आणि राज्यपालांकडे सादर केली आहे.
त्यामुळे ज्यांच्या अपात्रतेचं पत्र आम्ही दिलं आहे, त्यांना खुर्चीवर बसता येत नाही, त्यांनी बसलं नाही पाहिजे. असं असताना त्या खुर्चीवर बसल्या आहेत त्यामुळे त्या न्याय कसा देणार हा प्रश्न आहे असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.