फडणवीसांनी सूडाचे राजकारण केले : खा. संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांवर उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची मोठी जबाबदार होती; पण देवेंद्र फडणवीस यांनी सूडाचे राजकारण केले. या वृत्तीनं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा नाश केला. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत राज्याच्या जनतेने बदला घेतला, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत आज (दि.६ जून) बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणतात, “राजकारणात अशी नौटंकी सर्रास सुरूच आहे. फडणवीसांचे नेतृत्व महाराष्ट्राने नाकारले. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत विष कालवले आणि त्याची किंमत ते आता चुकवत आहेत.
फडणवीसांनी पेशवेकालीन आनंदीबाईंसारखे राजकारण केलं. लोकांचा जेवढा राग मोदी शहांवर नाही तेवढा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, असेही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.